Narendra Modi Visits Maharashtra
पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी महाराष्ट्राच्या दौ-यावर असणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते 7500 कोटी रुपयांच्या बहुविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन, शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन तसेच 86 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आणि निळवंडे धरणाचे जलपूजन करून कालव्याचे लोकार्पण करणार आहेत.
पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी दुपारी एकच्या सुमारास अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथे पोहोचणार आहेत. श्री साईबाबा समाधी मंदिरात पूजा आणि दर्शन घेऊन, मंदिरातील नवीन दर्शन रांग संकुलाचे उद्घाटन करणार आहेत. दुपारी दोन वाजता, पंतप्रधान निळवंडे धरणाचे जलपूजन आणि धरणाच्या कालव्याचे लोकार्पण करतील. 3.15 च्या सुमारास शिर्डी येथे एका सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थित राहून आरोग्य, रेल्वे, रस्ते आणि तेल आणि वायू यांसारख्या क्षेत्रातील सुमारे 7500 कोटी रुपयांच्या बहुविध विकास प्रकल्पांची पायाभरणी करणार आहेत.
शिर्डी येथील नवीन दर्शनरांग संकुलाचे उद्घाटन
शिर्डी संस्थान येथे अत्याधुनिक तंत्रज्ञानानेयुक्त नवीन दर्शनरांग संकुलाचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. या नवीन इमारतीत विविध सोयीसुविधांची असणार आहेत. यामध्ये दहा हजारांहून अधिक भाविकांच्या एकत्रित आसनक्षमतेसह अनेक वेटिंग हॉल, क्लोक रूम, स्वच्छतागृहे, बुकिंग काउंटर, प्रसाद काउंटर, माहिती केंद्रासारख्या वातानुकूलित कक्षांची सोय करण्यात आली आहे . ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
निळवंडे धरणाचे जलपूजन डाव्या कालव्याचे लोकार्पण
शिर्डी संस्थानचे दर्शन घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी निळवंडे धरणाच्या डाव्या काठाच्या (८५ किमी) कालव्याचे जाळे देशाला समर्पित करणार आहेत. यामुळे पाण्याचे पाइप वितरण जाळे सुकर होईल व सात तालुक्यांतील (अहमदनगर जिल्ह्यातील सहा आणि नाशिक जिल्ह्यातील एक) 182 गावांना याचा लाभ होणार आहे. यासाठी सुमारे 5177 कोटी रुपये निधी खर्च करण्यात येत आहे.
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा शुभारंभ
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा शुभारंभ पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 86 लाखाहून अधिक लाभार्थ्यांना दरवर्षी 6000 रुपयांची अतिरिक्त रक्कम देण्यात येणार आहे.
तसेच अहमदनगर शासकीय रुग्णालयामधील आयुष हॉस्पिटलसह अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि लोकार्पण, कुर्डुवाडी-लातूर रोड रेल्वे विभागाचे विद्युतीकरण (186 किमी); जळगाव ते भुसावळ जोडणारा तिसरा आणि चौथा रेल्वे मार्ग (24.46 किमी), एनएच-166 (पॅकेज-I) च्या सांगली ते बोरगाव विभागाचे चौपदरीकरण, इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या मनमाड टर्मिनलवर अतिरिक्त सुविधा आदी प्रकल्पांचे उद्घाटन तसेच माता व बाल आरोग्य शाखेची पायाभरणी, आयुष्मान कार्ड आणि स्वामित्व कार्डचे वाटप मोदी यांच्या हस्ते होणार आहे.
गोवा येथे 37 व्या राष्ट्रीय खेळांचे उद्घाटन
महाराष्ट्र दौरा संपन्न झाल्यानंतर मोदी गोवा राज्याला भेट देतील. गोव्यात पहिल्यांदाच होणाऱ्या 37 व्या राष्ट्रीय खेळांचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. मड़गाव येथे होणाऱ्या या खेळांमध्ये देशभरातील 10,000 पेक्षा अधिक खेळाडू 28 ठिकाणी 43हून अधिक क्रीडाशाखांमध्ये सहभागी होणार आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.