Ravan Dahan: अयोध्येचे राम मंदिर भारतीयांच्या संयमाचं प्रतीक : पंतप्रधान मोदी

Dussehra 2023 Vijayadashami : दिल्लीतील द्वारका रामलीला मैदानावर पंतप्रधान मोदींनी देशाला संबोधित केलं.
Prime Minister Modi
Prime Minister ModiSaam Tv
Published On

Prime Minister Modi:

आज देशभरात विजयादशमीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. देशभरात अनेक ठिकाणी रावणाच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील द्वारका रामलीला मैदानावर रामलीला पाहिली. त्यानंतर त्यांनी जाहीर सभेलाही संबोधित केलं.(Latest News)

राम मंदिर लवकरच बनणार आहे. लवकरच राम मंदिरात प्रभू रामाची मूर्ती विराजमान होणार आहे. आपलं नशीब आहे की, भगवान रामाचं मंदिर बनताना पाहू शकत आहे. पुढील रामनवमीला आयोध्यामधील रामललाच्या मंदिरात होणारे जयघोष हे संपूर्ण जगाला आनंद देईल. विजयादशमीचा हा सण अन्यायावर न्यायाचा, अहंकारावर नम्रतेचा आणि क्रोधावर संयमाचा विजय करणारा सण आहे. विजयादशीच्या दिवशी शस्त्र पूजा केली जाते.

भारताच्या भूमीवर शस्त्रांची पूजा करणं म्हणजे त्या शस्त्राचा वापर आपण कोणावर अधिराज्य करण्यासाठी करत नाही. तर आपला देशाची भूमीचं संरक्षण करण्यासाठी करतो. आपल्या गीतेचं ज्ञान आहे त्याचबरोबर आयएनस विक्रांत आणि तेजसचं निर्माण करण्याचं ज्ञान ही आपल्याला आहे. आपण प्रभू रामचंद्राच्या मर्यादेही जाणून आहोत आणि आपल्या देशाच्या सीमेची रक्षा कशी करावी याचीही कल्पना आपल्याला असल्याचं मोदी म्हणाले.

चंद्रयान-३ विषयी पंतप्रधान मोदींनी म्हणाले की, यावेळी आपण विजयादशी अशावेळी साजरी करत आहोत, जेव्हा चंद्रावर आपण विजय मिळवून दोन महिने झाले आहेत. आपण सर्वांना लक्षात घेतलं पाहिजे की, फक्त रावणाचा पुतळा न जाळता त्याच्यासारख्या प्रकृतीचं दहन आपण केलं पाहिजे. कारण विकृतीमुळे समजातील मानवता नष्ट होते. आज आपण समाजातून वाईट गोष्टी आणि भेदभावाचा अंत करण्याचा संकल्प केला पाहिजे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

हे रावण दहन म्हणजे जातीवाद आणि प्रांतवादाच्या नावावरून भारत मातेला विभागण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचेही आपण दहन केले पाहिजे. विजयादशीचा विजय हा फक्त रामाने रावणावर मिळवलेला विजय नाही.तर वाईट गोष्टीवर राष्ट्रभक्तीने मिळवलेला विजय सण मानला पाहिजे.

Prime Minister Modi
#Shorts : Uddhav Thackeray यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल..

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com