Gujarat Fire
गुजरातमधील अरवली जिल्ह्यात एका कंपनीला आग लागून केमिकलने भरलेले ६० टँकर जळून खाक झाले आहेत. आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. दरम्यान आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या.
मिळालेल्या माहितीनुसार, अरवली जिल्ह्यातील एका कंपनीत बुधवारी अचानक आग लागली. आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही मात्र एका क्षणात आगीने रौद्ररूप धारण केले. आग संपूर्ण कंपनीत पसरली. कंपनीत केमिकलने भरलेले टँकर होते. हे टँकर या आगीत सापडले. टँकरमध्ये केमिकल भरलेले असल्यामुळे सर्व टँकर आगीत भस्मसात झाले. आगीच्या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून आगीचे लोट उटताना दिसत आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
या आगीत आतापर्यंत जीवितहानी किंवा जखमी झाल्याची माहिती नाही. मात्र कंपनीचे मोठे नुकसान झाले असून कोट्यवधी रुपयाचा फटका बसला आहे. दरम्यान आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र तोपर्यंत कंपनीचा बराचसा भाग जळून खाक झाला होता. या घटनेची नोंद झाली असून आग कशामुळे लागली याची चौकशी सुरू आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.