Mumbai Local: मुंबईच्या लोकलमधील गर्दी होणार कमी; १५ डब्यांची लोकल कधी धावणार, तारीख आली समोर

Mumbai Local Train Update: केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वेच्या महत्त्वाच्या घोषणांनंतर जूनपर्यंत १५ डब्यांच्या लोकल गाड्यासंदर्भात मोठी अपडेट समोर आलीय. मुंबईतील लोकल प्रवाशांना लवकरच दिलासा मिळणार आहे.
Mumbai Local Train Update:
Mumbai local 15 coach trains will run on tracks. saam tv
Published On
Summary
  • मार्च महिन्यापर्यंत दोन सेफ्टी डोअर च्या लोकल ट्रायल बेसिसवर धावणार

  • पंधरा डब्याच्या लोकल धावण्यासाठी फलाट तयार करण्यात येणार आहेत.

  • रेल्वेच्या ईस्ट आणि वेस्ट कनेक्टिव्हिटी स्पेशल कॉरिडॉर अंतर्गत कनेक्ट केलं जाणार

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रविवारी देशाचा अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी रेल्वेबाबत मोठ्या घोषणा त्यांनी केल्या. मुंबईसह देशभरात रेल्वेचं जाळं पसरवलं जाणार आहे. महाराष्ट्रात एकूण १ लाख ७० हजार कोटी रुपयांची रेल्वेची काम सुरू असून राज्यात रेल्वेसाठी २३ हजार ९२६ कोटीची तरतूद यंदाच्या अर्थसंकल्पात करण्यात आलीय.

याचदरम्यान मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेल्या लोकल ट्रेनच्या प्रवाशांसाठी एक अत्यंत मोठी आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. लोकलमधील प्रवास आता आरामदायी होणार आहे. जून महिन्यापर्यंत १५ डब्याच्या ट्रेन रुळावर धावतील. तर २३८ एसी लोकल २०२९ पर्यंत मुंबईकरांच्या सेवेसाठी येणार आहेत.

Mumbai Local Train Update:
मुंबईहून पुण्याला फक्त ४८ मिनिटात, केंद्र सरकारची मोठी घोषणा, वाचा काय होणार फायदा

दररोज लाखोच्या प्रवासी लोकलमधून प्रवास करतात. ही बाब लक्षात घेत मुंबईमध्ये १५ डब्यांची लोकल सेवे आणली जाणार आहे. लोकलमधील प्रवाशांची गर्दी लक्षात घेता लोकल ट्रेमधील डब्यांची संख्या वाढवली जाणार आहे. आता १५ डब्यांची लोकल सेवेत आणली जाणार आहे. जून महिन्यातही ही सेवा सुरू केली जाणार आहे. जून महिन्यापर्यंत पंधरा डब्याच्या लोकल धावण्यासाठी फलाट तयार करण्यात येणार आहेत.

Mumbai Local Train Update:
Railways Rule: जर ट्रेन चुकली तर त्याच तिकिटावर दुसऱ्या गाडीनं प्रवास करता येतो? काय आहे रेल्वेचा नियम?

मध्य रेल्वेने प्लॅटफॉर्म विस्तारीकरणासाठी मोठी मोहीम हाती घेतली आहे. मुंबई मंडळातील एकूण ३४रेल्वे स्थानकांमध्ये हे काम सुरूय. लोकलमधील वाढत्या गर्दीमुळे प्रवाशांची मागणी होती की १२ डब्यांच्या सध्याच्या गाड्यांऐवजी १५ डब्यांच्या लोकल चालवण्यात याव्यात. रेल्वे प्रशासनाने अखेर या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिलाय.

Mumbai Local Train Update:
Indian Railways: रेल्वेतून दारू नेता येते का? जर दारूची बाटली सापडली तर काय होते शिक्षा, काय आहेत नियम?

याचदरम्यान रेल्वेच्या ईस्ट आणि वेस्ट कनेक्टिव्हिटी स्पेशल कॉरिडॉर अंतर्गत कनेक्ट केलं जाईल. त्यामधून मोठ्या प्रमाणात मालवाहतूक वाढवली जाण्याचा प्रयत्न असणार असल्याची माहिती मध्यवर्ती रेल्वेकडून देण्यात आलीय. येत्या मार्च महिन्यापर्यंत दोन सेफ्टी डोअरच्या लोकल ट्रायल बेसिसवर धावल्या जाणार आहेत. यासह २०२९पर्यंत मुंबईकरांच्या सेवेत २३८ एसी लोकल ट्रेन येणार आहेत. मेट्रोसारख्या सुविधांनी सुसज्ज असलेला हा प्रकल्प मुंबई रेल विकास महामंडळ (MUTP-3 आणि 3A) अंतर्गत १९,२९३ कोटी रुपये खर्चून बांधला जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com