Indian Railways:रेल्वेत दारू नेता येते का? जर दारूची बाटली सापडली तर काय होते शिक्षा, काय आहेत नियम?

Indian Railways Alcohol Rules : भारतीय रेल्वेमध्ये दारू बाळगण्यास परवानगी आहे का? रेल्वे प्रवासादरम्यान दारू आढळल्यास कायदेशीर मर्यादा, रेल्वेचे नियम, दंड आणि शिक्षा जाणून घ्या.
Indian Railways Alcohol Rules :
Railway police checking luggage during a routine inspection at an Indian railway station.saam tv
Published On
Summary
  • रेल्वेत दारू पिणे पूर्णपणे बेकायदेशीर

  • सीलबंद आणि मर्यादित प्रमाणात दारू नेण्यास अटींसह परवानगी

  • नियम मोडल्यास दंड किंवा अटक होऊ शकत

भारतात मद्यपानाबाबातचे कायदे खूप कडक आहेत, ज्यामुळे मद्यपान करुन गाडी चालवणे किंवा कार्यालयात जाणे गुन्हा आहे. प्रवास करताना दारूची बाटली बाळगली तर गुन्हा ठरतो का असा प्रश्न पडत असतो. विशेषतः रेल्वेने प्रवास करताना हा प्रश्न पडत असतो. पण त्याबाबत काही नियम आहेत. तसेच नियम मोडल्यास कडक शिक्षा देखील होऊ शकते.

Indian Railways Alcohol Rules :
वंदे भारत स्लीपर आणि अमृत भारत ट्रेनचं तिकीट रद्द करायचंय? जाणून घ्या रेल्वेचे नियम,नाहीतर होईल नुकसान

रेल्वेतून लाखो लोक प्रवास करतात. यामुळे रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी भारतीय रेल्वे विभागाने सुरक्षिततेसाठी कठोर नियम बनवले आहेत. यातील भारतीय रेल्वे कायदा १९८९ थेट दारूवर बंदी घालत नसला तरी हा नियम राज्य कायद्यांच्या अधीन आहे. जर एखाद्या राज्यात दारूवर बंदी आहे, त्या राज्यातून प्रवास करताना गुन्हा मानला जाऊ शकतो. तर अशा राज्यातून प्रवास करत असाल जिथे मद्यपानावर बंदी नाही तरच ट्रेनमध्ये दारू बाळगणे शक्य आहे.

Indian Railways Alcohol Rules :
Amrit Bharat Express: उत्तर महाराष्ट्र थेट जोडणार पूर्व भारताशी; आता नाशिक, जळगावहून थेट दार्जिलिंग गाठा, जाणून घ्या ट्रेनचं वेळापत्रक

देशातील काही राज्यांनी बंदी लागू केली आहे. यात गुजरात,बिहार, नागालँड आणि लक्षद्वीप या राज्यांचा समावेश होतो. जर तुमची ट्रेन या राज्यांमधून जात असेल आणि तुमच्या जवळ दारूची बाटली आढळली तर तुम्हाला कायदेशीर अडचणींना सामोरे जावे लागू शकते. संबंधित राज्याच्या उत्पादन शुल्क कायद्यांतर्गत कारवाई केली जाते.

रेल्वे नियमांनुसार ट्रेनमधून प्रवास करणारे प्रवासी मर्यादित प्रमाणात सीलबंद दारुच्या बाटल्या नेऊ शकतात. तेही वैयक्तिक वापरासाठी परवानगी दिली जाते. तुम्ही ट्रेनमध्ये फक्त २ लिटर दारुच्या बाटल्या नेता येतात. पण त्या बाटल्या सीलबंद असणे गरजेचे आहे. तुम्ही ट्रेनमध्ये रिकाम्या बाटल्या नेऊ शकत नाही, तसेच ट्रेनमध्ये किंवा प्लॅटफॉर्मवर दारू पिण्यास मनाई आहे. रेल्वे कायद्यानुसार, नियम मोडल्यास सहा महिन्यांपर्यंत तुरुंगवास, 500 ते 1000 रुपये दंड किंवा दोन्ही होऊ शकतो. दरम्यान दारूबंदी असलेल्या राज्यात दारूसह पकडल्यास, कायद्यानुसार अटक, मोठा दंड आणि तुरुंगवास देखील होऊ शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com