हृदयद्रावक! स्कूल बसने आजी-नातीला चिरडले, कुशीतील ९ महिन्याचे बाळ चाकाखाली, मुंबईतील मन हेलावणारा VIDEO

South Mumbai School Bus Accident : मुंबईच्या खेतवाडी परिसरात स्कूल बसच्या भीषण अपघातात आजी, नाती आणि कुशीत असलेले ९ महिन्यांचे बाळ बसखाली सापडले. सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल झाला असून पोलिसांनी बस चालकाला अटक केली आहे.
Khetwadi Accident Video
Khetwadi Accident VideoSaam TV Marathi
Published On

Mumbai School Bus Accident : दक्षिण मुंबईतील खेतवाडी परिसरात मंगळवारी दुपारी एक काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली. शाळेतून नातीला घरी घेऊन जाणाऱ्या एका महिलेला स्कूल बसने जोरदार (Khetwadi Accident Video) धडक दिली. या भीषण अपघातात महिलेच्या कुशीत असलेल्या अवघ्या नऊ महिन्यांच्या बाळाचा (Khetwadi CCTV Video) बसच्या चाकाखाली चिरडून जागीच मृत्यू (Khetwadi Accident) म झाला. या घटनेचा अंगावर शहारे आणणारा सीसीटीव्ही व्हिडीओ आता समोर आला आहे. (South Mumbai News)

सीसीटीव्ही फुटेजमध्ये कुलाब्यातील जेबी सोमण शाळेत (J.B. Somani School Bus Accident) शिकणारी महिलेची नात दुपारी १२.२३ वाजता बसमधून उतरताना दिसतेय. बाळाला हातात घेऊन ती महिला मुलीचा हात धरते आणि ते बससमोरून रस्ता ओलांडत होती. महिलेच्या कुशीत एक बाळ (9 Month Old Baby Death Mumbai) होते अन् नातीला हाताला धरून ती रस्ता ओलांडत होती. त्याचवेळी बस आपल्या ठिकाणाहून पुढे निघाली अन् त्यांना चिरडले. यामध्ये शाळेत शिकणारी मुलगी अन् आजी यांना जबर दुखापत झाली. तर महिलेच्या कुशीत असणारे बाळ चाकाखाली गेल्याने मृत्यू पावले. (School Bus Crushed Grandmother and Granddaughter)

Khetwadi Accident Video
Ladki Bahin Update: बंद झालेला ₹१५०० चा हप्ता पुन्हा सुरू होणार? e-KYC वर मंत्र्याची मोठी घोषणा, जाणून घ्या नवी अपडेट

महिला, कुशीत बाळ अन् मुलगी बसच्या धडकेनंतर जमिनीवर पडल्याचे व्हिडिओत दिसतेय. बसचे पुढचे उजवे चाक महिलेवर आणि बाळावर गेल्याचे व्हिडिओत दिसतेय. या धडकेत बाळाचा जागीच मृत्यू झाला. तर महिला आणि शाळकरी मुलगी जखमी झाली. या दुर्घटनेनंतर स्थानिकांनी तात्काळ धाव घेत बचावकार्य केले. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी बस चालकाला अटक (Mumbai Police Arrest School Bus Driver) केली असून तपास केला जात आहे.

Khetwadi Accident Video
गुडन्यूज! लाडकीच्या खात्यात ₹२१०० येणार, एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा, नेमकं काय म्हणाले

ही दुर्घटना अचानक घडल्यामुळे खेतवाडी परिसरात एकच गोंधळ उडाला. स्थानिकांनी तात्काळ धाव घेत महिलेला बसखालून बाहेर काढले अन् जवळच्या रूग्णालयात दाखल केले. अपघाताची माहिती मिळताच खेतवाडी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करत स्कूल बस चालकावर गुन्हा दाखल करत ताब्यात घेतलेय. अपघातात जखमी झालेल्या महिलेला सरकारी रूग्णालयात दाखल केलेय. या दुर्दैवी अपघाताचा व्हिडिओ व्हायरल झालाय.

Khetwadi Accident Video
धक्कादायक! अंत्यसंस्कारानंतर आजींच्या अस्थी गेल्या कुठे? नातेवाईकांची पोलीस ठाण्यात धाव, मग झाला मोठा खुलासा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com