चाकूचा धाक दाखवत बहीण-भावाला मारहाण; ओळख लपवून आरोपीचा पोलिसांना चकवा

Meghwadi Police Crack Down On Knife-and-Bat Terror Accused: जोगेश्वरी पूर्वेतील ईदगाह मैदान परिसरात चाकू आणि बेसबॉल बॅट घेऊन दहशत निर्माण केल्याप्रकरणी मेघवाडी पोलिसांनी आरोपीला अटक केली. जुन्या वादातून भावंडांना मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप.
Jogeshwari East knife and baseball bat terror accused arrested
Jogeshwari East knife and baseball bat terror accused arrestedsaam tv
Published On

संजय गडदे, साम टीव्ही

मुंबई: जोगेश्वरी पूर्वेतील ईदगाह मैदान परिसरात हातात चाकू आणि बेसबॉल बॅट घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या एका आरोपीला मेघवाडी पोलिसांनी अटक केली. जुन्या वादातून एका व्यक्तीला आणि त्याच्या बहिणीला रस्त्यात अडवून मारहाण करणे, अश्लील शिवीगाळ करणे तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपीवर आरोप आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीने आपली ओळख लपवून पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न केला; मात्र विशेष शोध पथकाने सापळा रचून त्याला प्रेमनगर परिसरातून ताब्यात घेतले.

Jogeshwari East knife and baseball bat terror accused arrested
Crime: अल्पवयीन भाचीवर मानलेल्या मामाकडून बलात्कार, अंबरनाथ हादरले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १९ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास जोगेश्वरी पूर्व येथील ईदगाह मैदान परिसरात ही घटना घडली. शमशाद शेख उर्फ ‘भंगारवाला’ (वय ३०) याने जुन्या वादाचा राग मनात धरून फिर्यादी अदनान इरफान शेख आणि त्यांच्या बहिणीला रस्त्यात अडवले. यावेळी आरोपीने त्यांच्याशी वाद घालत मारहाण केली. त्यानंतर हातातील चाकू आणि बेसबॉल बॅट हवेत फिरवत परिसरात दहशत निर्माण केल्याचा आरोप आहे. तसेच अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.

Jogeshwari East knife and baseball bat terror accused arrested
Mumbai Crime: मुंबई हादरली! ९ वीच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार, ६ जणांकडून अश्लिल व्हिडीओद्वारे ब्लॅकमेल

या घटनेनंतर मेघवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी पोलिसांना चकवा देण्यासाठी आपले नाव आणि ओळख लपवून वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. त्यामुळे त्याला पकडण्यासाठी मेघवाडी पोलिसांनी विशेष शोध मोहीम सुरू केली. दरम्यान, २३ ऑगस्ट रोजी पोलिसांना आरोपी प्रेमनगर परिसरात लपून बसल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. माहितीच्या आधारे पोलिसांनी परिसरात सापळा रचला. आरोपीची हालचाल लक्षात येताच पोलिसांनी शिताफीने त्याला ताब्यात घेतले. अटकेच्या वेळी सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

Jogeshwari East knife and baseball bat terror accused arrested
Mumbai Police: ड्रग्ज विक्री करताना पोलिसाला अटक, मुंबई पोलिस दलात खळबळ

तपासादरम्यान आरोपीने गुन्ह्यात वापरलेला चाकू आणि बेसबॉल बॅट लपवून ठेवली असल्याचे समोर आले आहे. या हत्यारांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असून, प्रकरणाचा अधिक तपास मेघवाडी पोलीस करीत आहेत. ही कारवाई पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शालिग्राम, पोलीस निरीक्षक पवरे आणि पोलीस उपनिरीक्षक सुहास कादे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पोलीस हवालदार राजे ठाकूर, पोलीस शिपाई सुनील माने, अक्षय सातपुते, शुभम पाटील, संदीप शिरसाट, आकाश राठोड आणि शैलेश पवार यांच्या विशेष पथकाने आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केली.

Jogeshwari East knife and baseball bat terror accused arrested
Crime: माझ्यापेक्षा मुलीवर जास्त प्रेम करते, तरुणाने जन्मदात्या आईला संपवलं, नवी मुंबईतील संतापजनक घटना

जोगेश्वरी परिसरात हत्यारे घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या आरोपीवर पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. कायदा आणि सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असा संदेश या कारवाईतून पोलिसांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com