Crime: माझ्यापेक्षा मुलीवर जास्त प्रेम करते, तरुणाने जन्मदात्या आईला संपवलं, नवी मुंबईतील संतापजनक घटना

Navi Mumbai Crime: नवी मुंबईत तरुणाने आईची हत्या केली. कौटुंबीक वादातून रागाच्या भरात तरुणाने जमिनीवर डोकं आपटून आईला संपवलं.
Crime: माझ्यापेक्षा मुलीवर जास्त प्रेम करते, तरुणाने जन्मदात्या आईला संपवलं, नवी मुंबईतील संतापजनक घटना
Navi Mumbai CrimeSaam Tv
Published On
  • नवी मुंबईत मुलाने केली आईची हत्या

  • कौटुंबिक वादातून घडली घटना

  • डोकं जमिनीवर आपटून आईला संपवलं

  • मुलीवर जास्त प्रेम करते म्हणून भांडण झालं त्यानंतर तरुणाने आईची हत्या केली

माझ्यापेक्षा मुलीवर जास्त प्रेम करते यावरून झालेल्या वादात संतप्त झालेल्या तरुणाने जन्मदात्या आईची हत्या केली. नवी मुंबईतील जुहूगावात ही संतापजनक घटना घडली. जमिनीवर डोकं आपटून आरोपीने आईची हत्या केली. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. सध्या पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, 'आई घरात मुलगा आणि सुनेकडे लक्ष देण्याऐवजी मुलीकडे जास्त लक्ष देत असल्याच्या रागातून मुलाने हे भयंकर कृत्य केले. रविवारी रात्रीच्या सुमारास आई आणि मुलामध्ये याच कारणावरून कडाक्याचे भांडण झाले. त्यानंतर रागाच्या भरात मुलाने आईला ढकलून दिलं नंतर जमिनीवर डोकं आपटून तिची हत्या केली. मंदा कदम असं हत्या झालेल्या महिलेचे नाव होते. या घटनेनंतर नवी मुंबई पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १३ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

Crime: माझ्यापेक्षा मुलीवर जास्त प्रेम करते, तरुणाने जन्मदात्या आईला संपवलं, नवी मुंबईतील संतापजनक घटना
Thane Crime: गर्लफ्रेंडला घेऊन लॉजवर गेला, भांडणानंतर राग डोक्यात गेला; हत्या करून तरुणाने पळ काढला

धुळ्याच्या साक्री तालुक्यातील वाकी गावात पतीने आपल्या पत्नीची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पिंपळनेर पोलिसांनी वेगाने तपास करत अवघ्या दोन तासांत संशयित आरोपीला अटक केली. या हत्येचे नेमके कारण काय याचा पोलिस तपास करत आहेत. चारित्र्याच्या संशयावरून आरोपीने पत्नीची हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

Crime: माझ्यापेक्षा मुलीवर जास्त प्रेम करते, तरुणाने जन्मदात्या आईला संपवलं, नवी मुंबईतील संतापजनक घटना
Baramati Crime: शरीरसंबंध ठेवण्यापूर्वी बॉयफ्रेंडने गोळी दिली, काही तासांत तरुणीचा मृत्यू; बारामती हादरली

वाकी गावच्या शिवारातील शेतात एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली. हत्या झालेल्या महिलेचे नाव सुनंदा गोटू चौधरी (वय ४० वर्षे) असे होते. पिंपळनेर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत अवघ्या दोन तासांत संशयित आरोपी पती गोटू गनसाराम चौधरी (वय ४६ वर्षे) याला अटक केली. चौकशीत त्याने बायकोच्या हत्येची कबुली दिली. याप्रकरणी पिंपळनेर पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com