Belapur-Panvel Harbour Line: ट्रान्सहार्बर मार्गावरील लोकलसेवा पुन्हा विस्कळीत, फक्त ठाणे ते बेलापूर लोकल धावणार; प्रवाशांचे हाल

Trans Harbour Line: ट्रान्स हार्बर मार्गावर फक्त ठाणे ते बेलापूरपर्यंतच लोकल धावणार आहे. त्यामुळे कामाला जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहे.
trans harbour line
trans harbour line Saam Tv
Published On: 

Mumbai Trans Hurbour Line News Today:

ट्रान्सहार्बर मार्गावरून (Trans Hurbour Line) प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. ट्रान्सहार्बर मार्गावरील लोकलसेवा पुन्हा विस्कळीत झाली आहे. गेल्या चार दिवसांपासून हार्बर मार्गावर सुरू असलेला गोंधळ आजही पाहायला मिळत आहे. ट्रान्स हार्बर मार्गावर फक्त ठाणे ते बेलापूरपर्यंतच लोकल धावणार आहे. त्यामुळे कामाला जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहे.

trans harbour line
Pune News: पुण्यात माजी नगरसेविकेवर अत्याचार; फोटो व्हायरल करण्याची धमकी देत १० लाख रुपये उकळले

मिळालेल्या माहितीनुसार, ट्रान्सहार्बर मार्गावरील लोकलसेवा विस्कळीत झाली आहे. ठाणे ते पनवेल लोकलसेवा फक्त बेलापूरपर्यंतच धावणार आहे. ठाण्यावरून पनवेलला जाण्यासाठी प्रवाशांना बेलापूरवरून लोकल बदली करावी लागणार आहे. सीएसएमटी ते पनवेल या मार्गावरील लोकलसेवा सुरळीत सुरू आहे. त्यामुळे ठाण्यावरून पनवेलला जाणाऱ्या प्रवाशांनी बेलापूरला उतरून सीएसटी-पनवेल लोकलने प्रवास करावा असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

हार्बर मार्गांवर मध्यरात्रीचा ब्लॉक घेण्यात आला असून सुरु असलेल्या कामामुळे रेल्वे प्रशासनाने ट्रान्स हार्बर मार्गावरील बेलापूर ते पनवेल लोकलसेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील निर्णय येईपर्यंत या मार्गावरील लोकलसेवा बंद राहणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. ऐवढंच नाही तर ठाण्यावरून सुटणाऱ्या लोकल देखील उशिराने धावत आहेत. त्यामुळे रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे.

trans harbour line
Wardha Accident : खड्ड्याने केला घात; हिंगणघाटात ट्रॅव्हल्स बसला भीषण अपघात, एकाचा मृत्यू, ८ जण जखमी

बेलापूर ते पनवेल ट्रान्स हार्बर मार्गावर लोकल धावणार नसल्याची घोषणा प्रत्येक रेल्वे स्थानकांवर करण्यात येत आहे. या मार्गावरून फक्त ठाणे ते बेलापूरपर्यंत लोकल धावणार आहेत असे सांगितले जात आहे.अचानक लोकल रद्द करण्यात आल्यामुळे प्रवाशांचा गोंधळ उडाला आहे. प्रवाशांना ऑफिसला पोहचण्यासाठी उशीर झाल्यामुळे आजही लेटमार्क लागणार आहे.

trans harbour line
Sanjay Raut : एकनाथ शिंदेंचे मुख्यमंत्रिपद आणि अजित पवारांची आमदारकी जाणार, संजय राऊतांचं भाकित, फडणवीसांवरही संतापले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com