प्रमोद जगताप
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), देवेंद्र फडणवीस, संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कार्यपद्धतीवरही संजय राऊत यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
कोर्टाने आणि विधीमंडळाच्या अध्यक्षांनी मनात आणलं की कायद्याने वागायचं, तर मुख्यमंत्री ५ मिनिटसुद्धा त्या पदावर राहू शकत नाही. बेकायदेशीररित्या त्यांना त्या पदावर बसवलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सुद्धा आमदारकी जाणार आहे, जर कायद्याने वागले तर. २०२४ नंतर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना मोठा राजकीय धक्का बसणार असल्याचं भाकितही संजय राऊत यांनी वर्तवलं आहे. (Latest Marathi News)
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कार्यपद्धतीवर बोलताना संजय राऊत यांनी म्हटलं की, इतके बेकायदेशीर विधानसभा अध्यक्ष देशाच्या इतिहासात झाले नाहीत. त्यांनी कायद्याची भाषा करणं म्हणजे घटनेचा अपमान आहे. ते वकील आहेत, मात्र त्यांनी कायद्याची भाषा करणे म्हणजे हास्यजत्रा आहे. (Political News)
२०१९ साली राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या सूचना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्या होत्या, असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला. फडणवीसांच्या दाव्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा खोटारडा माणूस मी माझ्या आयुष्यात पाहिला नाही, असं दुर्दैवाने मला म्हणावं लागतंय. महाविकास आघाडीच्या नेत्यांना बदनाम करण्याचं काम सुरू आहे. राज्यात मृत्यूचं तांडव सुरु आहे, त्यावर बोला, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.