४० कोटींचा जीएसटी महाघोटाळा; मुंबईत अमित उपाध्यायला अटक, ८ हून अधिक बोगस कंपन्यांचे जाळे

Mumbai GST Fraud News : मुंबई जीएसटी विभागाने बनावट जीएसटी बिले आणि बोगस आयटीसीद्वारे सुमारे ४० कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अमित उपाध्याय याला अटक केली आहे.
Amit Upadhyay GST fraud case
Amit Upadhyay GST fraud case
Published On

Mumbai GST fake invoice scam, Amit Upadhyay GST fraud case : बनावट जीएसटी बिले तयार करून सुमारे ४० कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी मुंबई जीएसटी विभागाकडून अमित उपाध्याय याला अटक करण्यात आली आहे. अमित उपाध्याय हा ८ पेक्षा अधिक कंपन्यांचा संचालक असून, बनावट कागदपत्रे आणि खोट्या व्यवहारांच्या आधारे सुमारे ४० कोटी रुपयांचा जीएसटी रिटर्न मिळवल्याचा आरोप आहे.

DGGI च्या तपासात माल किंवा सेवा पुरवठा न करता बनावट इनव्हॉइसच्या माध्यमातून ITC घेतल्याचे समोर आल्याची माहिती आहे. उपाध्यायविरोधात एमआरए मार्ग पोलीस ठाणे तसेच ईडीकडेही तक्रारी दाखल आहेत. एमआरए मार्ग पोलीस ठाण्यात अनिस खान यांनीही आर्थिक फसवणूक आणि कट रचून फसवणूक केल्याची तक्रार अमित उपाध्यायविरोधात दिली आहे.

अमित उपाध्याय हे Alphaneon Techsolutions Private Limited (ATPL) तसेच 'अल्फानेऑन ग्रुप'च्या इतर ७ कंपन्यांचे संचालक (Director) आणि अधिकृत स्वाक्षरीकर्ता आहेत. १४ मे २०२६ रोजी दुपारी १:१५ वाजता मुंबई येथे त्यांना वरिष्ठ आसूचना अधिकारी (Senior Intelligence Officer) चंद्र शेखर तिवारी यांनी अटक केली. अमित उपाध्याय यांनी इतर सहकाऱ्यांसोबत मिळून कोणतीही वस्तू किंवा सेवांची प्रत्यक्ष देवाणघेवाण (Supply) न करता केवळ बोगस बिले (Invoices) बनवून नियमबाह्य पद्धतीने इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) मिळवले आणि ते पुढे पास केले.

Amit Upadhyay GST fraud case
Petrol Diesel Price : सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले! पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ; जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

तपासणीत समोर आले आहे की, त्यांच्या 'ATPL' कंपनीने अस्तित्व नसलेल्या किंवा रद्द झालेल्या पुरवठादारांकडून २०,१९,३३,००० रुपये (सुमारे २०.१९ कोटी रुपये) चे बोगस इनपुट टॅक्स क्रेडिट मिळवले. आतापर्यंतच्या तपासानुसार, या संपूर्ण नेटवर्कद्वारे ३७,६७,६६,८३८ रुपये (सुमारे ३७.६७ कोटी रुपये) चे नियमबाह्य आयटीसी (ITC) मिळवण्यात आले आणि ४०,२९,०९,५९३ रुपये (सुमारे ४०.२९ कोटी रुपये) चे बोगस आयटीसी इतर कंपन्यांना बेकायदेशीरपणे पुढे पास करण्यात आले. यामुळे सरकारी खजिन्याचे मोठे नुकसान झाले आहे.

Amit Upadhyay GST fraud case
Accident : स्वामींच्या दर्शनाला जाताना भीषण अपघात, दीड वर्षाच्या चिमुकल्यासह २ महिलांचा जागीच मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com