Mumbai : मुंबईकरांचा प्रवास होणार सुपरफास्ट! गोरेगाव-मुलुंड लिंक रोड 'या' तारखेपासून प्रवशांसाठी होणार खुला

Mumbai Goregaon Mulund Link Road Update : मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी! गोरेगाव-मुलुंड जोड मार्गावरील 1.26 किमी उड्डाणपूल 15 ऑक्टोबरपासून वाहतुकीस खुला होणार असून प्रवासाचा वेळ कमी होण्याची अपेक्षा आहे.
Mulund Goregaon Road Link Flyover News
Mulund Goregaon Road Link Flyover NewsAI Image
Published On: 
Summary
  • मुंबईकरांचा प्रवास होणार वेगवान

  • गोरेगाव-मुलुंड लिंक रोड १५ ऑक्टोबरपासून हा उड्डाणपूल सुरु होणार

  • ७५ मिनिटांवरून २५ मिनिटांपर्यंत कमी होण्याची शक्यता

मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग अर्थात GMLR प्रकल्पातील महत्त्वाचा टप्पा आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. गोरेगाव आणि दादासाहेब फाळके चित्रनगरीदरम्यान उभारण्यात येत असलेल्या १.२६ किलोमीटर लांबीच्या उड्डाणपुलाचे काम जवळपास पूर्ण झाले असून, येत्या १५ ऑक्टोबरपासून हा पूल नागरिकांसाठी वाहतुकीस खुला करण्यात येणार आहे. त्यामुळे गोरेगाव ते मुलुंड दरम्यानचा प्रवास सुपर फास्ट होणार आहे.

गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग हा मुंबईतील पश्चिम आणि पूर्व उपनगरांना जोडणारा महत्त्वाचा प्रकल्प आहे. सुमारे 12.20 किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पामुळे दोन्ही उपनगरांमधील प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे. सध्या सुमारे 75 मिनिटांचा प्रवास भविष्यात अवघ्या 25 मिनिटांत पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी कमी होण्यासोबतच इंधनाची बचत आणि मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेतही सुधारणा होण्यास मदत होणार आहे.

Mulund Goregaon Road Link Flyover News
Egg Yolk : अंड्याचा पिवळा बलक खाल्ल्याने येऊ शकतो हार्ट अटॅक? नेमकं सत्य काय? जाणून घ्या

रत्नागिरी जंक्शन हॉटेलजवळून उड्डाणपूल वळत दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात खाली उतरतो. पूल वाहतुकीसाठी खुला करण्यापूर्वी ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात चाचणी घेण्यात येणार आहे. या चाचणीनंतर आवश्यक तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून 15 ऑक्टोबरपर्यंत पूल वाहतुकीसाठी सज्ज केला जाणार आहे. दरम्यान, पुलाखालील परिसरातील बॅरिकेड्स तातडीने हटवून रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्याचे निर्देश अभिजीत बांगर यांनी दिले आहेत. पुलालगतच्या 7.5 मीटर रुंदीच्या सर्व्हिस रोडचे कामही तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Mulund Goregaon Road Link Flyover News
Accident News : मरीन ड्राइव्हवर भीषण अपघात! कारची ट्रेलरला जोरदार धडक; मंत्र्याच्या मुलीसह ४ जणांचा जागीच मृत्यू

पुलावरील अंतिम कामे पूर्ण करण्यासोबतच वाहतूक सुरळीत राहण्यासाठी वाहतूक पोलिसांशी समन्वय साधून योग्य नियोजन करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. त्यामुळे 15 ऑक्टोबरपासून हा उड्डाणपूल सुरू झाल्यानंतर गोरेगाव आणि पूर्व उपनगरांदरम्यानच्या वाहतुकीला मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com