मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात; उभ्या कंटेनरला मागून धडकली कार; एकाचा जागीच मृत्‍यू

Mumbai-Goa Highway Accident : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर महाड तालुक्यातील चांढवे बुद्रुक गावाजवळ कंटेनर आणि कारचा अपघात झाला. उभ्या असलेल्या कंटेनरला कारनं मागून धडक दिली. यात एकाचा मृत्यू झाला आहे.
Mumbai-Goa Highway Accident :
HORRIFIC ACCIDENT ON MUMBAI-GOA HIGHWAY; ONE DEAD AFTER CAR HITS CONTAINERsaam tv
Published On
Summary
  • मुंबई-गोवा महामार्गावर कार आणि कंटेनरचा भीषण अपघात.

  • भरधाव कार उभ्या कंटेनरला मागून धडकली.

  • अपघातात एकाचा जागीच मृत्यू, चार जण जखमी झालेत.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर कंटेनर आणि कारचा भीषण अपघात घडला आहे. उभ्या असलेल्या कंटेनरला भरधाव कार मागून धडकली.ही धडक इतकी भयानक होती, यात कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. या दुर्घटनेत एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. अशोक महादेव राऊत (वय ७९) असे मृताचे नाव आहे.

Mumbai-Goa Highway Accident :
Sangli Breaking : वादळी वाऱ्यामुळं भिंत कोसळली, देवीच्या कार्यक्रमाला आलेल्या ६ भाविकांचा दबून मृत्यू

दहिसर, मुंबई येथील राऊत कुटुंबीय कोकणातून मुंबईला येत होते. महाड तालुक्यातील चांढवे बुद्रुक गावच्या हद्दीत राऊत कुटुंबीयांची कार आले असता अपघात घडला. येथील हॉटेल कृष्णा समोरील रस्त्यावर उभ्या असलेल्या कंटेनरला कारनं मागून धडक दिली. या कारमधून पाच जण प्रवास करत होते. राऊत कुटुंबीय कणकवली ते मुंबई प्रवास करीत होते. कारमधील पाच जणांपैकी एकाचा जागीच मृत्यू झाला तर इतर चार जखमी झालेत. जखमींवर महाडच्या ट्रॉम केअर युनिटमध्ये उपचार सुरू आहेत.

Mumbai-Goa Highway Accident :
Virar Crime: भरदिवसा RTI कार्यकर्त्याची दगडाने ठेचून निर्घृण हत्या; विरार हादरलं!

मिळालेल्या माहितीनुसार, कांदरपाडा, दहिसर येथील राऊत कुटुंबीय सकाळी कणकवली येथून मुंबईकडे MH 47 AG 4836 क्रमांकाच्या कारने निघाले होते. सायंकाळच्या सुमारास चांढवे बुद्रुक टोलनाक्याजवळ हॉटेल कृष्णा समोर रस्त्यावर उभ्या असलेल्या कंटेनरला कारने जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की कारचा पुढील भाग पूर्णपणे चिरडला गेला. या अपघातात अशोक महादेव राऊत यांचा जागीच मृत्यू झाला.

तर गीतांजली सुमित राऊत (वय ३६), सुमित अशोक राऊत (वय ४१), सीमा अशोक राऊत (वय ७६), अमित अशोक राऊत (वय ४९) तसेच अंगत सुमित राऊत (वय ७) हे जखमी झालेत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, महाड एमआयडीसी पोलीस आणि महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातप्रकरणी पुढील तपास एमआयडीसी पोलीस ठाण्यामार्फत केला जात आहे.

डंपर चालकाची १२०० फूट खोल दरीत उडी मारून आत्महत्या

आंबोली घाटात आंबोली गावठणवाडी येथील एका डंपर चालकाने मुख्य दरडीच्या ठिकाणी बाराशे फूट खोल दरीत उडी मारून आपली जीवनयात्रा संपविली. राजाराम कुडतरकर असे या तरुणाचे नाव असून सोमवारी रात्रीपासून हा डंपर आंबोली घाटातील मुख्य दरडीच्या परिसरात उभा होता.

रात्रभर डंपर एकाच ठिकाणी उभा असल्याचे आणि चालक राजाराम याचा कोणताही पत्ता लागत नसल्याने डंपर मालकाला संशय आला. त्यांनी याची खबर आंबोली पोलीसांना दिल्यानंतर ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीने मृतदेहाचा शोध लावण्यात यश आले आहे. घटनेचा अधिक तपास आंबोली पोलीस करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com