Adani-Ambani Face-Off: मराठी सण गुजराती ब्रँडिंग; गणेशोत्सवात अदानी-अंबानी वॉर

Adani-Ambani Face-Off Over Mumbai Ganeshotsav : आता बातमी गणेशोत्सवातल्या अदानी-अंबानी वॉरची. लालबागच्या राजाच्या तंबूत अंबानी आहेत तर आता अदानींनीही चिंचपोकळीच्या चिंतामणीची वाट धरलीय. त्यामुळे मराठी सण आणि उत्सवांचं गुजराती ब्रँडिग कसं सुरू आहे? त्यावचा हा रिपोर्ट.
Adani-Ambani Face-Off Over Mumbai Ganeshotsav
MUMBAI GANESHOTSAV: ADANI-AMBANI WAR, MARATHI FESTIVAL BRANDING ROWsaam tv
Published On
Summary
  • मुंबईच्या गणेशोत्सवात अदानी-अंबानींच्या सहभागाची चर्चा

  • लालबागचा राजा आणि चिंचपोकळी चिंतामणीच्या संदर्भामुळे मोठ्या उद्योगसमूहांच्या सहभागाचा मुद्दा चर्चेत

  • उद्योगपतींच्या सहभागावरून मनसेने आक्षेप घेतल्याने या विषयाला राजकीय रंग

मुंबईचा गणेशोत्सव म्हणजे डोळ्यांचे पारणे फेडणारा सोहळा! परळ-लालबागच्या गल्ल्यांमध्ये गिरणी कामगारांनी उभे केलेली गणेशमंडळं हे कायम देशभरातील गणेशभक्तांसाठी आकर्षणांची केंद्रबिंदू ठरली. पण ज्या गिरणी कामगारांनी, मराठी माणसांनी या गणेशोत्सवांना वलय मिळवून दिलं त्याच मराठी माणसांच्या हातून आधी गिरण्या सुटल्या मग लालबाल परळच्या चाळीतली घरं सुटली आणि आता त्यांची आठवण असलेली गणेशोत्सव मंडळंही उद्योगपतींच्या वळचळणीला जाऊन बसतायत. होय कारण लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाच्या सल्लागारपदी अनंतशेठ अंबानी बसल्यानंतर त्यांचे प्रतिस्पर्धी उद्योजक गौतमी अदानी आता चिंतामणीचे प्रायोजक झालेत. त्यामुळे मराठी सणांवर गुजराती ब्रँडिंग सुरू झालंय. यावरत मनसेनं तीव्र आक्षेप घेतलाय.

Adani-Ambani Face-Off Over Mumbai Ganeshotsav
Maharashtra Politics: अजित पवार गटाला मोठा धक्का; निष्ठावंत नेत्याचा राजीनामा,४ माजी नगरसेवकांसह शिवसेनेत करणार प्रवेश

लालबागच्या राजाच्या दर्शनाला देशभरातुन सर्वसामान्यांपासून अनेक VVIPयेतात. अमित शाह पासून अमिताभ बच्चन पर्यंत सगळेच.. घरगुती पुजाअर्चा असो की मंदिरांमध्ये देवदर्शन श्रद्धावानांप्रमाणे अंबानी कुटुंबिय देवभोळं असल्याचं अनेकदा दिसलंय. याच लालबागच्या राजाला अंबानींनी 20 किलो सोन्याचा मुकुटही अर्पण केला होता. त्यामुळे मंडळाशी अंबानी कुटुंबाचे नाते सर्वश्रुत आहे.

Adani-Ambani Face-Off Over Mumbai Ganeshotsav
Mumbai Ganeshotsav: भुलेश्वर दुर्घटनेनंतर BMC चा मोठा निर्णय! मोठ्या गणेशमूर्तीसाठी फिटनेस सर्टिफिकेट बंधनकारक

लालबागच्या राजाच्या कार्यकारिणीत अनंत अंबानींच्या समावेशानंतर आता चिंचपोकळीच्या चिंतामणीसोबत अदानी समूहाने औपचारिक पार्टनरशिप केलीये. पण १०० वर्षांची परंपरा असलेल्या कामगारांच्या उत्सवात थेट अदानींचा सहभाग झाल्यानं आता गणेशोत्सवातही उद्योगपतींचे कॉर्पोरेट वॉर सुरू झाल्याचं दिसतंय. सुरुवातीच्या काळात ना कुठली रोषणाई होती, ना मोठमोठे प्रायोजक. परिसरातील कामगार आणि स्थानिकांच्या छोट्या-छोट्या देणग्यांमधून बाप्पाचा उत्सव आकाराला आला.

स्वातंत्र्याची मशाल पेटवणारा हा गणेशोत्सव काळाच्या ओघात बदलला. मात्र आता या उत्सवांवर उद्योगपतींचं वर्चस्व वाढत गेलं तर मराठी सण आणि उत्सवांमध्येही भविष्यात गुजराती ब्रँडिंगसह अदानी-अंबानी वॉर दिसणार यात शंका नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com