मुंबईच्या धारावीत रक्तरंजित थरार; मित्रानेच मित्राला क्रूरपणे संपवलं

mumbai crime news : मुंबईच्या धारावीत मित्राने मित्राला संपवल्याची घटना घडली. या हत्येच्या घटनेने धारावी परिसरात खळबळ उडाली आहे.
mumbai news
mumbai crime news : Saam tv
Published On
Summary

मुंबईच्या धारावीमध्ये मित्रानेच केली मित्राची हत्या

क्षुल्लक वादातून झालेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू

धारावीच्या आशिक खानला पोलिसांकडून अटक

संजय गडदे,साम टीव्ही

मुंबईची धारावी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मुंबईच्या धारावी परिसरात मित्रानेच मित्राची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली. दोघांमधील वादानंतर झालेल्या हाणामारीत एक तरुण गंभीर जखमी झाला. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी रुग्णालयात दाखल केल्यानंतर गंभीर जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी मारहाण करणाऱ्या तरुणाला अटक केली आहे.

काही दिवसांपूर्वी मुंबईच्या धारावीत रक्तरंजित थरार घडला आहे. धारावीत २२ वर्षीय आशिक खान याने त्याचा मित्र अश्विनी नाडर याला बेदम मारहाण केली. आशिकने केलेल्या मारहाणीत अश्विनी रक्तबंबाळ झाला. अश्विनी रक्तबंबाळ झाला असतानाही आशिकने मारहाण सुरूच ठेवली होती. अश्विनीला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केले. परंतु रुग्णालयात अश्विनी नाडरचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

mumbai news
Shocking : घृणास्पद! चॉकलेटचं आमिष दाखवून निर्जनस्थळी नेलं, ४ वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या

नेमकं काय घडलं?

आरोपी आशिक खान आणि अश्विनी नाडर या दोघांमध्ये १६ मार्च रोजी वाद झाला. या वादानंतर झालेल्या हाणामारीत अश्विनी गंभीर जखमी झाले. त्याला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात दाखल केलेल्या अश्विनीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अश्विनीच्या हत्येप्रकरणी आशिक खानला अटक करण्यात आली आहे. त्याला २३ मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्यात येणार आहे. या दोघांनाही नशेचे व्यसन असल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे.

व्हिडिओमध्ये काय दिसत आहे?

दोघांमध्ये हाणामारी होत असल्याचे दिसत आहे. घटनास्थळी उपस्थित नागरिक दोघांचा वाद सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. आशिक खानच्या हल्ल्यात अश्विनी नाडर गंभीर जखमी झाल्यानंतर उपस्थित तरुणांनी वाद सोडवण्यास पुढे आले. त्यांनी दोघांचा वाद सोडवला. त्यानंतर संतापलेल्या नागरिकांनी आरोपी आशिक खानला बेदम मारहाण केली.

mumbai news
Maharashtra Live News Update: केडीएमसी मुख्यालयासमोर एका तरुणाला बेदम मारहाण

या व्हिडिओमध्ये अश्विनी रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर पडलेला दिसत आहे. एकीकडे आशिक खानला पकडल्यानंतर काही नागरिकांनी अश्विनी नाडर याला तातडीने रुग्णालयात केले. परंतु आशिक खानच्या जीवघेण्या हल्ल्यात अश्विनीचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. अश्विनी नाडरच्या मृत्यूने धारावी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com