MHADA : म्हाडाच्या ३२ वर्षांच्या सरकारी नोंदी गायब, ९ माजी कर्मचारी पोलिसांच्या रडारवर

Mumbai MHADA News : मुंबईतील कफ परेड येथील म्हाडाच्या रामदूत इमारतीच्या १९७५ ते २००७ या कालावधीतील मूळ नोंदी गायब झाल्याचा प्रकार उघड. प्रकरणी गुन्हा दाखल; नऊ माजी कर्मचाऱ्यांची चौकशी होण्याची शक्यता.
Mumbai Mahada
Mahada newsAI Image
Published On: 
Summary
  • म्हाडाच्या अभिलेखागारातील १९७५ ते २००७ या कालावधीतील मूळ सरकारी नोंदी उपलब्ध नसल्याचे उघड झाले

  • कफ परेड येथील रामदूत इमारत क्रमांक ४ मधील सदनिकेच्या कागदपत्रांशी संबंधित प्रकरण

  • म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणी पोलिसांत फौजदारी तक्रार दाखल केली

संजय गडदे, मुंबई

दक्षिण मुंबईतील कफ परेड परिसरातील म्हाडाच्या रामदूत इमारत क्रमांक ४ मधील सदनिकांच्या कागदपत्रांबाबत गंभीर प्रकार समोर आला आहे. म्हाडाच्या अभिलेखागारातून १९७५ ते २००७ या कालावधीतील मूळ सरकारी नोंदी गायब झाल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी १९ ऑक्टोबर २०२६ रोजी म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात म्हाडाच्या नऊ माजी कर्मचाऱ्यांची चौकशी होण्याची शक्यता असून, मुंबई पोलिसांकडून गायब झालेली फाईल आणि या प्रकरणामागील सूत्रधाराचा शोध घेतला जाणार आहे.

रामदूत इमारतीतील सदनिकेच्या कागदपत्रांची माहिती मिळवण्यासाठी माहिती अधिकार कार्यकर्ते प्रशांत सत्यवान कोकणे यांनी माहिती अधिकार कायद्यांतर्गत अर्ज केला होता. मात्र, संबंधित नोंदी उपलब्ध नसल्याचे समोर आले. त्यानंतर हे प्रकरण राज्य माहिती आयोगामार्गे मुंबई उच्च न्यायालयापर्यंत पोहोचले. उच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेतल्यानंतर म्हाडा प्रशासनाने या प्रकरणाची विभागीय चौकशी सुरू केली. चौकशी समितीचा अहवाल आल्यानंतर म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.

Mumbai Mahada
Weather Update : राज्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस, 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

चौकशीदरम्यान म्हाडाच्या अभिलेखागारातून तब्बल ३२ वर्षांच्या सरकारी नोंदी गायब झाल्याचे समोर आले. या नोंदींच्या आधारे दक्षिण मुंबईतील मोक्याच्या ठिकाणी असलेली महागडी सदनिका दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप आहे. चौकशी अधिकारी तथा कार्यकारी अभियंता अभय रामटेके यांच्या अहवालात काही अज्ञात भू-माफिया आणि म्हाडाचे तत्कालीन कर्मचारी यांच्या संभाव्य संगनमतातून मूळ फाईल गायब करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. प्रशांत पवार या अपात्र अर्जदाराला सदनिका बेकायदेशीरपणे हस्तांतरित करण्याचा यामागे उद्देश असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

Mumbai Mahada
Potato Peels : बटाटा सोलून साली फेकून देता? 'असा' करा वापर, ८ दिवसांत दिसेल चमत्कार

नऊ माजी कर्मचाऱ्यांची चौकशी होणार

या प्रकरणी म्हाडाचे अधिकारी प्रमोद ज्ञानबा कांबळे यांनी महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधिनियम २००५ च्या कलम ९ अंतर्गत फौजदारी तक्रार दाखल केली आहे. गायब झालेली मूळ फाईल नेमकी कोणी आणि कशासाठी गायब केली, तसेच यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास पोलीस करणार आहेत. गायब झालेली फाईल आणि या प्रकरणातील कथित सूत्रधारापर्यंत पोहोचण्यासाठी म्हाडाच्या नऊ माजी कर्मचाऱ्यांची चौकशी करण्याची तयारी मुंबई पोलिसांनी केली आहे. या तपासातून सरकारी मालमत्तेच्या कथित गैरव्यवहाराबाबत आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com