Mumbai Congress Protest: धक्काबुक्की, ठिय्या, नारेबाजी, अदानी स्मार्ट मीटरविरोधात काँग्रेसचं बीकेसीत आक्रमक आंदोलन

Mumbai Congress Protest BKC: अदानी स्मार्ट मीटरविरोधात काँग्रेसने बीकेसीत आंदोलन काढलं. ऐनवेळी पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकरल्याने या आंदोलनाने आक्रमक रुप घेतलंय.
Mumbai Congress Protest: ठिय्या, नारेबाजी, अदानी स्मार्ट मीटरविरोधात काँग्रेसचं बीकेसीत आक्रमक आंदोलन
Mumbai Congress Protest In BKC:
Published On

अदानी स्मार्ट मीटरविरोधातील काँग्रेसचं आंदोलन तापलंय. ऐनवेळी पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारल्यानं काँग्रेस कार्यकर्त्यांनी बीकेसीमधील डीसीपी कार्यालयात ठिय्या मांडला. यावेळी नवर्निवाचित वर्षा गायकवाड, आमदार भाई जगताप हे चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले.

हा मोर्चा जनमाणसाचा अत्यंत महत्त्वाचा असलेल्या प्रश्नासाठी काढला होता. वीजेचे वाढलेल्या दरामुळे येणारं भलं मोठं बील आणि अदानी स्मार्ट मीटरच्या माध्यमातून घेतलं जाणारं भगवं सूत याच्याविरोधात हे आंदोलन आम्ही केलं.परंतु अदानीचं हित जपणाऱ्या सरकारने पोलिसांच्या मदतीने आमच्या गाड्या ताब्यात घेतल्या. कार्यकर्त्यांना अडवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. यातून सरकारने मुंबईकर आणि सर्वसामान्य जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला, असं खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या.

पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारल्यानं त्या खासदार गायकवाड यांनी सरकारविरोधात संताप व्यक्त केला. गायकवाड यांनी यावेळी वीजदर कमी करण्यात यावे,स्मार्ट मीटर रद्द झालं पाहिजे, अशी मागणीही खासदार वर्षा गायकवाड यांनी केली.

पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या गाड्या ताब्यात घेतल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात येत आहे. परवानगी नाकरल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी बीकेसीतील पोलीस कार्यालयावर आक्रमक मोर्चा काढला. अदानीच्या विरोधात आंदोलन करणार होतो. मात्र पोलिसांनी आंदोलनाला परवानगी अचानक नाकारली, जो पर्यंत परवानगी दिली जात नाही तोपर्यंत आम्ही कुठेही जाणार नाही पोलीस स्टेशनमध्ये आम्ही ठिय्या आंदोलन करणार आहोत, असं काँग्रेस नेते अस्लम शेख म्हणालेत.

अदानीच्या विरोधात आंदोलन आहे म्हणून आणि अंबानीच्या घरात लग्न असल्यामुळे परवानगी दिली जात नाही. अदानी आणि अंबानी देशासाठी महत्त्वपूर्ण आहेत का? मात्र आम्ही सर्व सामान्य जनतेच्या प्रश्र्नसाठी लढत राहू,असं काँग्रेस नेते म्हणालेत. आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांना २ दिवसआधीच सांगितलं होत. पण अचानक आज परवानगी नाकारली. सगळ्या बसेस थांबण्यात आल्या आहेत. ठिकठिकाणी कार्यकर्त्यांना थांबण्यात आले आहे. ईस्ट इंडिया कंपनीच्या वेळी जी परिस्थिती होती तशीच परिस्थिती आता निर्माण झाली आहे. लोकशाही राहिलेली आहे की नाही असा प्रश्न पडलाय, असं अस्लम शेख म्हणाले.

Mumbai Congress Protest: ठिय्या, नारेबाजी, अदानी स्मार्ट मीटरविरोधात काँग्रेसचं बीकेसीत आक्रमक आंदोलन
Ravindra Dhangekar: लाडकी बहीण योजनेचे विरोधी आमदाराने लावले बॅनर; योजनेची माहिती देऊन होतेय टीका

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com