Loksabha Election Result: मोठी बातमी! अटीतटीच्या लढतीत काँग्रेसच्या वर्षा गायकवाड विजयी; उज्वल निकम यांचा पराभव

Mumbai North Central Loksabha Election: मुंबई उत्तरमध्य लोकसभा मतदार संघात काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी विजय मिळवला आहे. वर्षा गायकवाड यांनी उज्वल निकम यांचा पराभव केला.
Breaking News: अटीतटीच्या लढतीत काँग्रेसच्या वर्षा गायकवाड विजयी;  उज्वल निकम यांचा पराभव
Ujjwal Nikam Vs Varsha Gaikwad From Mumbai North Central Lok Sabha Election 2024Saam TV

सचिन गाड| मुंबई, ता. ४ जून २०२४

संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या मुंबई उत्तर मध्य लोकसभा निवडणुकीचा अंतिम निकाल समोर आला आहे. मुंबई उत्तर मध्य लोकसभेतून काँग्रेसच्या वर्षा गायकवाड विजयी झाल्यात. वर्षा गायकवाड यांनी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार वकिल उज्वल निकम यांचा पराभव करत दिल्लीचे तिकीट मिळवली आहे.

मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदार संघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. याठिकाणी महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या नेत्या वर्षा गायकवाड यांच्याविरुद्ध भारतीय जनता पक्षाने वकील उज्वल निकम यांना तिकीट दिले होते. मुंबईमध्ये उज्वल निकम यांना मानणारा मोठा उच्चशिक्षित मतदार जास्त असल्याने तसेच या मतदारसंघांवर भाजपचा प्रभाव असल्याने वर्षा गायकवाड यांच्यासमोर मोठे आव्हान होते.

आजच्या मतमोजणीतही उज्वल निकम यांनी मोठी आघाडी घेतली होती. मात्र अगदी अखेरच्या काही फेऱ्यांमध्ये वर्षा गायकवाड यांनी जोरदार मुसंडी मारत दणदणीत विजय मिळवला. या विजयासोबत अनेक वर्षांनी काँग्रेसने मुंबईमध्ये लोकसभेची जागा मिळवली आहे.

Breaking News: अटीतटीच्या लढतीत काँग्रेसच्या वर्षा गायकवाड विजयी;  उज्वल निकम यांचा पराभव
Prakash Ambedkar News: अकोल्यात प्रकाश आंबेडकर खासदारकीपासून वंचित! भावुक पोस्ट करत म्हणाले, 'आशा सोडलेली नाही...'

दरम्यान, राज्यात अनेक ठिकाणी महाविकास आघाडीने घवघवीत यश संपादन केले आहे. लोकसभा निवडणुकीत मिळालेले हे यश मविआसाठी नवसंजीवनी असून सत्तेतील महायुतीला मोठा धक्का मानला जात आहे.

Breaking News: अटीतटीच्या लढतीत काँग्रेसच्या वर्षा गायकवाड विजयी;  उज्वल निकम यांचा पराभव
Sangli Loksabha News: पठ्ठ्याने करुन दाखवलं ! सांगलीच्या खासदारकीचा 'चंद्रहार' विशाल पाटलांच्या गळ्यात

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com