सचिन जाधव, साम प्रतिनिधी
महायुतीच्या सरकारने राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केलीय. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरूय. या योजनेचा लाभ कसा घ्यायचा याची माहिती देणं एका आमदाराला महागात पडलंय. योजनेचे बोर्ड लावल्याने ते टीकेचे धनी बनलेत.
पुण्यातील अपघात प्रकरण असो, की शहरातील काय सुव्यवस्था असो यावरुन काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी सरकारला सळो की पळो करू सोडतात. परंतु ज्या याच सरकारच्या योजनेची भुरळ रवींद्र धंगेकरांना पडली. धंगेकर यांनी शहरात लाडकी बहीण योजनेचा बोर्ड लावल्यानंतर धंगेकरांवर टीका केली जातेय.
पुण्यातील कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्याकडून "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" योजनेचे बोर्ड लावण्यात आलेत. या बोर्डवर योजनेबाबतची सर्व माहिती देण्यात आलीय. तरीही रवींद्र धंगेकर यांच्यावर टीका केली जातेय. त्यामागे कारण आहे, त्यांच्या आक्रमकपणाची भूमिका. धंगेकर हे विविध मुद्द्यांवरून सरकारला धारेवर धरत असतात. आता त्यांनी सरकारच्या योजनेवरून स्वत: चीस जाहिरात केलीय, त्यावरुन त्यांच्यावर टीका केली जातेय.
एकीकडे विरोधी पक्ष नेत्यांकडून या योजनेवर टीका केली जातेय. तर दुसरीकडे त्यांच्याच पक्षातील आमदार सरकारी योजनेचा लाभ देण्याच्या माध्यमातून महिला मतदाराना आकर्षित करत असताना दिसत आहेत. विशेष म्हणजे या बोर्डवर ना मुख्यमंत्र्यांचा फोटो ना सरकारचा उल्लेख, बोर्डवर स्वतःचा आणि त्यांच्या पत्नीचा फोटो लावलाय. तर बोर्डाच्या वरच्या भागात उद्धव ठाकरे, शरद पवार आणि सोनिया गांधी यांचे फोटो लावण्यात आलेत. एकीकडे सरकारवर वारंवार टीका करणारे आमदार रवींद्र धंगेकर यांनी सरकारच्याच योजनेचा बोर्ड लावल्याने त्याच्यावर टीका केली जातेय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.