Sangli Lok Sabha: सांगलीच्या जागेचा तिढा वाढला! काँग्रेस आमदार विश्वजीत कदम आक्रमक; पटोले यांना पत्राद्वारे थेट दिला इशारा

Sangli Lok Sabha Constituency: सांगलीत महाविकास आघाडीची डोकेदुख वाढताना दिसत आहे. सांगलीत ठाकरे गट आणि काँग्रेस आमनेसामने आल्याचं चित्र निर्माण झालं आहे.
Sangli Lok Sabha Constituency
Sangli Lok Sabha ConstituencySaam Tv
Published On

विजय पाटील, सांगली

Sangli Lok Sabha Constituency:

सांगलीत महाविकास आघाडीची डोकेदुख वाढताना दिसत आहे. सांगलीत ठाकरे गट आणि काँग्रेस आमनेसामने आल्याचं चित्र निर्माण झालं आहे. मविआत चर्चा सुरु असताना येथे ठाकरे गटाने आपला उमेदवार जाहीर केला आहे. ठाकरे गटाने चंद्रहार पाटील यांना उमेदवार म्हणून घोषित केलं. यानंतर स्थानिक काँग्रेस नेत्याने नाराजी व्यक्त केली होती. याचमुद्द्यावर आता काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

सांगलीच्या जागेचा तिढा सुटत नसल्याने विश्वजीत कदम यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पत्र पाठवले आहे. विश्वजीत कदम यांची काँग्रेसच्या राज्य प्रचार समितीच्या सदस्यपदी 30 मार्च रोजी निवड करण्यात आली आहे. सांगलीच्या जागेबाबत विश्वजीत कदम यांची ठाम भूमिका घेत जागेचा तिढा सुटत नसेल तर काँग्रेसच्या बैठकीला येणार नसल्याचा पवित्रा घेतला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Sangli Lok Sabha Constituency
Yavatmal News: चुकीच्या उपचारांमुळे 13 वर्षीय मुलीचा गेला जीव? डॉक्टरांवर आई वडिलांनी केला गंभीर आरोप

याचबाबत त्यांनी नाना पटोले यांना पत्र पाठवलं आहे. या पत्रात ते म्हणाले आहे की, ''३० मार्च रोजीचे काँग्रेस राज्य प्रचार समितीच्या निवडीचे व बैठकीचे पत्र मला मिळाले. आपण माझी प्रचार समितीच्या सदस्यपदी निवड केली त्याबद्दल मी अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, महाराष्ट्र राज्याचे प्रभारी रमेश चेन्निथलाजी व आपला मनापासून आभारी आहे.'' (Latest Marathi News)

यात पुढे लिहिलं आहे की, ''राज्यात आगामी लोकसभा निवडणूक ही काँग्रेस पक्ष व महाविकास आघाडी म्हणून आपण सर्वजण ताकदीने लढवणारच आहोत. माझी व सांगली जिल्ह्यातील काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांची सांगली लोकसभेच्या जागेबाबतीत असणारी भावना आपण जाणत आहात. गेल्या काही दिवसांपासून सांगली व राज्यातील इतर काही लोकसभेच्या जागांचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. काँग्रेस पक्ष सांगली लोकसभेची जागा लढवण्यास सक्षम आहे. या भूमिकेवरती मी व सांगली जिल्ह्यातील कार्यकर्ते आज ही ठाम आहे. तसेच अद्याप ही सांगली लोकसभा जागेबाबतीत काँग्रेस पक्ष व महाविकास आघाडीने एकत्रितपणे आम्हाला कोणताही निर्णय कळविलेला नाही.''

Sangli Lok Sabha Constituency
Maharashtra Weather News: राज्यात उष्णतेचा कहर, चंद्रपुरात सर्वाधिक तापमान; कोणत्या जिल्ह्यात कसं आहे वातावरण? जाणून घ्या

ते पुढे म्हणाले, ''जोपर्यंत सांगली लोकसभेच्या जागेचा तिढा सुटत नाही, तोपर्यंत सांगली जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता व आमदार म्हणून मी या बैठकीस अनुपस्थित राहण्याचा निर्णय घेतला आहे. आपण दिलेल्या संधीबद्दल मी आपला आभारी आहे.''

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com