Mumbai Crime : फैय्याजला मुंबईतील ३० हजार नागरिकांना का मारायचं होतं? चौकशीदरम्यान सांगितलं खरं कारण

Mumbai Muharram Case Update News : मुंबईतील भायखळा परिसरातील मोहरम मिरवणुकीत विषारी कॅप्सूल वाटून नागरिकांचा जीव घेण्याच्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. आरोपीने एकटेपणातून आणि मानसिक तणावातून हे केल्याचे कबूल.
MUMBAI MUHARRAM POISON PLOT FOILED: PUNE MAN ARRESTED FOR DISTRIBUTING RAT POISON CAPSULES
MUMBAI MUHARRAM POISON PLOT FOILED: PUNE MAN ARRESTED FOR DISTRIBUTING RAT POISON CAPSULESSaam tv
Published On
Summary
  • भायखळा पोलिसांनी मोहरम मिरवणुकीतील मोठा घातपाताचा कट उधळला

  • पुण्यातील फैयाज प्रेमजीला विषारी कॅप्सूल प्रकरणी अटक केली

  • फॉरेन्सिक तपासात कॅप्सूलमध्ये उंदराचे विष आढळले

संजय गडदे, मुंबई

मुंबईतील भायखळा परिसरात आयोजित करण्यात आलेल्या मोहरम मिरवणुकीत मोठी जीवितहानी घडवून आणण्याचा धक्कादायक कट भायखळा पोलिसांनी उधळून लावला आहे. याबाबत आता मोठी अपडेट समोर आली आहे. औषधाच्या नावाखाली उंदराचे विष मिसळलेल्या कॅप्सूलचे वाटप केल्याप्रकरणी पुण्यातील विमाननगर येथील रहिवासी फैयाज प्रेमजी याला अटक करण्यात आली आहे. फैयाजने एकटेपणातून आणि मानसिक तणावातून हे पाऊल उचलले असल्याचं म्हटलं आहे. या घटनेमुळे मुंबईसह राज्यभरात खळबळ उडाली आहे.

मानसिक तणावातून रचला कट

पोलिसांच्या प्राथमिक तपासात आरोपीचा दोन वर्षांपूर्वी घटस्फोट झाला असून तो पत्नीपासून विभक्त राहत असल्याचे समोर आले आहे. या काळात तो मानसिक तणावातून जात होता. त्याचबरोबर समाजाविषयी त्याच्या मनात तीव्र नकारात्मक भावना निर्माण झाल्या. याच भावनेतून मोठ्या गर्दीला लक्ष्य करण्याचा कट त्याने आखल्याचे पोलीस चौकशीत समोर आले.

MUMBAI MUHARRAM POISON PLOT FOILED: PUNE MAN ARRESTED FOR DISTRIBUTING RAT POISON CAPSULES
Rain Alert : पावसानं जोर पकडला, पुढचे २४ तास महत्वाचे; मुंबई- पुण्यासह ३० जिल्ह्यांना अलर्ट; वाचा हवामानाचा अंदाज

'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

मोहरम मिरवणुकीदरम्यान आरोपीने भाविकांना वेदनाशामक कॅप्सूल असल्याचे सांगत काही कॅप्सूल वाटल्या होत्या. गोवंडी येथील सलमान सय्यद यांनी त्यापैकी एक कॅप्सूल घेतल्यानंतर त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला. तपासादरम्यान आरोपी डोंगरी परिसरातील एका गेस्ट हाऊसमध्ये राहत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी तेथे छापा टाकून मोठ्या प्रमाणात संशयास्पद कॅप्सूल जप्त केल्या. फॉरेन्सिक तपासणीत या कॅप्सूलमध्ये झिंक फॉस्फाईड हे उंदराचे विष असल्याचे स्पष्ट झाले.

MUMBAI MUHARRAM POISON PLOT FOILED: PUNE MAN ARRESTED FOR DISTRIBUTING RAT POISON CAPSULES
Health Care : महिनाभर चहा पिणे बंद केल्यास शरीरात कोणते बदल होतात? वाचा

पोलीस तपासात धक्कादायक खुलासा

पोलिसांच्या माहितीनुसार आरोपीने ऑनलाइन सुमारे ५० किलो झिंक फॉस्फाईड मागवले होते आणि प्रत्येक कॅप्सूलमध्ये सुमारे एक ग्रॅम विष भरले होते. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, झिंक फॉस्फाईड शरीरात गेल्यानंतर त्याची पोटात रिॲक्शन होऊन अत्यंत विषारी फॉस्फिन वायू तयार होतो. त्यामुळे श्वसनक्रिया आणि शरीरातील ऑक्सिजन पुरवठ्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोकांनी या कॅप्सूलचे सेवन केले असते तर गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

MUMBAI MUHARRAM POISON PLOT FOILED: PUNE MAN ARRESTED FOR DISTRIBUTING RAT POISON CAPSULES
Perfume Hack : परफ्युमचा सुगंध उडतो? ९९% लोकांना माहितीच नाही

आरोपीवर गुन्हा दाखल

या प्रकरणी आरोपीविरुद्ध खुनाचा प्रयत्न, सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न तसेच विषाद्वारे दुखापत करण्यासह विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने आरोपीला पोलीस कोठडी सुनावली असून त्याची मानसिक स्थिती, कटामागील नेमका उद्देश आणि या प्रकरणात इतर कोणाचा सहभाग आहे का याचा सखोल तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com