BMC Elections: एकीकडं महापौरपदासाठी चढाओढ, दुसरीकडं हॉटेल पॉलिटिक्स, मुंबईत शिजतंय तिसरंच राजकारण...

Mumbai Politics: मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपने ऐतिहासिक विजय मिळवलाय. याचदरम्यान काँग्रेसमध्ये मोठं राजकारण तापलंय. वर्षा गायकवाड यांच्या राजीनाम्याच्या मागणी भाई जगताप यांनी केली आहे.
Mumbai Politics
Congress internal conflict after Mumbai municipal election defeatSaam tv
Published On
Summary
  • मुंबई महापालिकेत भाजपचा ऐतिहासिक विजय, महापौरपदासाठी चढाओढ

  • ठाकरे गट दुसऱ्या तर शिंदे शिवसेना तिसऱ्या स्थानावर

  • शिंदे गटाकडून नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवण्याचा नवा डाव

मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपनं ऐतिहासिक विजय मिळवला. तर दुसऱ्या क्रमांकावर ठाकरे गट आहे. तिसऱ्या स्थानी शिंदे शिवसेना आहे. मुंबई महापालिकेत महापौरसाठी चढाओढ चालू आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदेंनी नवा डाव खेळत नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवलंय. अशा घटनांमुळे मुंबईत तिसरं राजकारण पेटलंय. मुंबईचा महापौर कोण होणार असा प्रश्न विचारला जात असताना मुंबईत काँग्रेसमध्ये मोठ्या हालचाली वाढल्या आहेत.

Mumbai Politics
Maharashtra Politics: शरद पवार गटाला मोठा धक्का; बड्या नेत्याचा राजीनामा, महापालिकेतील पराभव जिव्हारी लागला

मुंबई महानगरपालिकेत भाजपचा मोठा विजय झाला. या निवडणुकीत काँग्रेसला दारुण पराभव पत्करावा लागला. यावरून काँग्रेस पक्षात कलह सुरू झालाय. पक्षाच्या मुंबई अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांच्या राजीनाम्याची मागणी केली जातेय. काँग्रेस आमदार भाई जगताप यांनी वर्षा गायकवाड यांच्या राजीनाम्याची मागणी केलीय. मात्र गायकवाड यांचा राजीनामा मागणाऱ्या जगताप यांनाच काँग्रेस पक्षाने नोटीस पाठवली आहे. त्यांना पक्षाने ७ दिवसांत उत्तर मागितले आहे.

आमदार भाई जगताप यांनी दिल्लीतील पक्षश्रेष्ठींना पत्र लिहून गायकवाड यांच्या राजीनाम्याची मागणी केलीय. तसेच "बीएमसी निवडणुकीतून समोर येणारे ट्रेंड आणि आकडे काँग्रेस पक्षाच्या इतिहासातील दुर्दैवी आहेत. काँग्रेस पक्षाची स्थिती यापूर्वी कधीही इतकी वाईट नव्हती. या निवडणुकीत निर्माण झालेली परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. दिल्लीतील काँग्रेस नेतृत्वाने याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. फक्त चिंता करू नका, तर काँग्रेस पक्षात काय चालले आहे यावरही चिंतन करा, असंही भाई जगताप यांनी आपल्या पत्रात लिहिलंय.

Mumbai Politics
Amravati Politics: नवनीत राणा यांना पक्षातून निष्कासित करा; भाजप उमेदवारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी, काय आहे कारण?

भाई जगताप यांना कारणे दाखवा नोटीस का बाजवली?

भाई जगताप यांनी सार्वजनिक ठिकाणी केलेली विधाने आणि त्यांच्या कृतीमुळे पक्षाकडून त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. भाई जगताप यांनी खुले माध्यम आणि सार्वजनिक मंचांवर केलेली विधाने पक्षाच्या प्रस्थापित नियमावली, शिस्त आणि नैतिकतेच्या विरोधात आहेत. संघटनात्मक कामकाज, नेतृत्व आणि अंतर्गत मतभेद हे पक्षाच्या अंतर्गत मंचांवरच मांडले गेले पाहिजेत.

अशा प्रकारच्या सार्वजनिक वक्तव्यांमुळे पक्षाच्या सामूहिक नेतृत्वाला धक्का बसतो, पक्षाची प्रतिमा मलिन होते. आवश्यक असलेल्या संघटनात्मक एकतेला बाधा पोहोचते, असं नोटीसमध्ये नमूद केलंय. या पार्श्वभूमीवर जगताप यांना नोटीस प्राप्त झाल्याच्या दिवसापासून सात दिवसात लेखी स्पष्टीकरण देण्याचे निर्देश देण्यात आलेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com