

अमरावती महापालिकेत भाजपला पराभवामुळे अंतर्गत नाराजी
भाजप उमेदवारांचा नवनीत राणा यांच्याविरोधात उघड मोर्चा
मुख्यमंत्र्यांकडे पत्र पाठवून कारवाईची मागणी
अमरावती महानगरपालिकेत भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या असतील नेत्यांमध्ये मोठी नाराजी आहे.पराभवामुळे नाराज झालेल्या उमदेवारांनी पक्ष नेत्या नवनीत राणा यांच्याविरुद्ध मोर्चा उघडलाय. उमेदवारांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून नवनीत राणा यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केलीय. अमरावतीमध्ये भाजपच्या अनेक उमेदवारांचा पराभव झालाय. या उमेदवारांनी नवनीत राणा यांच्यावर हल्लाबोल करत त्यांच्यावर पराभवाचं खापर फोडलंय. नवनीत राण भाजपचा नायनाट करतील,असा आरोपही या उमेदवारांनी केलाय.
मतदानाला ५ दिवस बाकी असताना नवनीत राणा यांनी भाजपच्या उमेदवारांविरोधात प्रचार केला. भाजपचे उमेदवार डमी आणि युवा स्वाभिमानचे उमेदवार हेच खरे भाजपचे उमेदवार असा प्रचार त्यांनी केल्याचा आरोप भाजपच्या नेत्यांनी केलाय. दरम्यान अमरावती महापालिकेच्या ८७ जागेसाठी झालेल्या या निवडणुकीत २२ प्रभागात एकूण ६६१ उमेदवार रिंगणात होते. या २२ प्रभागातील ८७ जागांपैकी २५ जागा जिंकून भाजप सगळ्यात मोठा पक्ष बनला. पण मागील ४५ जिंकलेल्या जागांचा विचार करता भाजपला मतदारांनी नाकारले असल्याचं चित्र शहरात आहे.
तर दुसरीकडे युवा स्वाभिमान पक्षाने १५ जागा जिंकून दुसरा मोठा पक्ष ठरलाय. या खालोखाल काँग्रेसने आपले १५ नगरसेवक निवडून आणलेत. तर असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएम पक्षाने १२ जागांवर विजय मिळवलाय. तर महापालिकेत बहुमतासाठी ४५चा आकडा भाजप कसा जुळविणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलंय. दरम्यान भाजपला सत्ता स्थापनेसाठी युवा स्वाभिमानी किंवा राष्ट्रवादी अजित पवार गटाला सोबत घ्यावे लागेल. युवा स्वाभिमान पक्ष सत्ता स्थापनेत निर्णायक ठरणार आहे. मात्र पक्षाच्या पराभूत उमेदवारांनी नवनीत राणा यांना निलंबित करण्याची मागणी केलीय. तयामुळे अमरावतीमधील राजकारण तापलंय.
आमचा पराभव जनतेने नव्हे नवनीत राणा यांनी केला आहे. भाजप नेत्या नवनीत राणा यांना पक्षातून निष्कासित करा, अशी मागणी पराभूत झालेल्या २२ उमेदवारांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे. या मागणीने चांगलीच खळबळ उडाली आहे. नवनीत राणा यांना भाजपातून बाहेरचा रस्ता न दाखवल्यास त्या भविष्यात अमरावती शहरात भाजपाचा पूर्णपणे नायनाट केल्याशिवाय राहणार नाहीत असा उल्लेख उमेदवारांनी आपल्या पत्रात केलाय.
शेवटच्या पाच दिवसात नवनीत राणा खुलेआम भाजपाच्या विरोधात प्रचारात उतरल्या. भाजपाचे उमेदवार डमी आणि युवा स्वाभिमानचे उमेदवार हेच खरे भाजपाचे उमेदवार असा आक्रमक प्रचार केला असा मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात उल्लेख. आम्ही भाजपाचे निष्ठावंत, परिश्रम करणारे व समाजाशी नाळ जुळलेले उमेदवार होतो.
या महानगरपालिकेच्या निवडणुकीत आमचा पराभव विरोधी पक्षाने नव्हे तर भाजपाच्याच वरिष्ठ नेत्या नवनीत कौर राणा यांनी केला. त्यांनी पक्षाशी खुलेआम गद्दारी केली आहे. भाजपमध्ये राहून त्यांनी भाजपचाच काटा काढण्याचे काम केले असल्याने त्यांचे पक्षातून निष्कासन करण्यात यावे अशी मागणी उमेदवारांनी केली आहे.
नवनीत राणा यांना भाजपातून बाहेरचा रस्ता न दाखवल्यास त्या भविष्यात अमरावती शहरातून भाजपचा पूर्णपणे नायनाट केल्याशिवाय राहणार नाहीत. नवनीत राणा यांनी प्रथम भाजपचा गढ असलेल्या प्रभागात स्वतःचे उमेदवार टाकून त्या संपूर्ण पॅनेल वर वरवंटा कसा फिरवला जाईल, याचे नियोजन केले. एकीकडे भाजपच्या सर्व पोस्टर्सवर स्वतःचा मोठा फोटो टाकून घेतला. त्यासाठी आमच्यावर शहर अध्यक्ष डॉ. नितीन धांडे यांचा दबाव होता. नंतर नवनीत राणा यांनी डॉ. धांडे यांच्या माध्यमातून संपूर्ण संघटना घरी बसवली, असा आरोप उमेदवारांनी केलाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.