लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावरून नवनीत राणा–ओवैसी आमनेसामने
“मी 6, तुम्ही 20 मुले जन्माला घाला” ओवैसींचं विधान चर्चेत
नवनीत राणांचा तीव्र प्रतिहल्ला, नागरिकत्वावर प्रश्न
धार्मिक आणि लोकसंख्या राजकारणावरून राजकीय तापमान वाढले
भाजपच्या माजी खासदार आणि एएमआयचे प्रमुख तथा खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्यात सध्या जोरदार शाब्दिक वाद पाहायला मिळत आहे. लोकसंख्या वाढीच्या मुद्यावरून या दोघांमध्ये शाब्दिक लढाई सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. नवनीत राणा यांनी हिंदूंना 3 ते 4 मुले जन्माला घालण्याचे आवाहन केले होते.
यावर ओवैसी यांनी यावर उत्तर देताना म्हणाले, तुम्हाला कोणी अडवलं आहे, मी 6 मुले जन्माला घातली आहेत. तुम्ही 20 मुलं जन्माला घाला. यावरच नवनीत राणा पुन्हा प्रतिहल्ला करत म्हणाल्या ओवैसी हे किडा असून त्यांना पाकिस्तानला हाकला असे विधान केले.
हिंदूंनी 3-4 मुले जन्माला घालावीत असे विधान माजी खासदार नवनीत राणा यांनी केले होते. यावर बोलताना ओवैसी यांनी म्हटले की, भारताचा एकूण प्रजनन दर झपाट्याने घटत आहे आणि मुस्लिमांचा प्रजनन दर सर्वाधिक वेगाने कमी होत आहे. परिस्थिति अशीच राहिली तर भविष्यात देशात वृद्धाची संख्या अधिक होईल. केवळ धार्मिक राजकारण करण्यापेक्षा देशाच्या डेमोग्राफीक डिव्हिडंडचा विचार करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली होती.
यावरच नवनीत राणा म्हणाल्या, ते जेष्ठ खासदार आहेत, देशाच्या संविधानाला पुढे ठेवणार का इस्लामला पुढे ठेवणार? यावर ओवैसी म्हणाले की इस्लामला पुढे ठेवू ओवैसींना भारत माता की जय, वंदे मातरम म्हणायला लाज वाटते. मी म्हटले की हिंदूंनी 3-4 मुले जन्माला घालायला हवी त्यावर ओवैसी म्हणतात की मला 6 मुले आहेत आणि 19 मुले जन्माला घालणाऱ्या मौलानाला भेटायला जाणार आहे. पश्चिम बंगालमध्ये घुसखोरांची संख्या कशी वाढली ते सांगा, आसाममध्ये 200 टक्क्यांनी वाढ झाली ते सांगा.
ओवैसींचं नागरिकत्व काढून त्यांना पाकिस्तानात फेका - नवनीत राणा
नवनीत राणा पुढे म्हणाल्या की, ओवैसींनी भारत माता की जय म्हणावे, आम्ही 10 मुले जन्माला घालायला तयार आहोत. ओवैसींचे नागरिकत्व काढून घेणे गरजेचे असून त्यांना पाकिस्तानात फेकून द्यायला हवे. त्या देशात 10-20 मुले जन्माला घातली तरी त्यांना कोणी विचारणार नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.