Accident News : मुंबई बंगळुरू महामार्गावर भीषण अपघात! वाहनांच्या जोरदार धडकेत २ जणांचा मृत्यू; १२ गंभीर जखमी

Mumbai-Bengaluru Highway Accident : मुंबई-बंगळूर महामार्गावरील जांभूळवाडी दरी पुलावर दोन ट्रक आणि दोन दुचाकींचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत २ जणांचा मृत्यू तर १२ जण जखमी झाले.
Mumbai Banglore Highway Accident News
Mumbai Banglore Highway Accident News Saam tv
Published On
Summary
  • मुंबई-बंगळूरू महामार्गावर भीषण अपघात

  • जांभूळवाडी दरी पुलावर मध्यरात्री दोन ट्रक आणि दोन मोटारींचा भीषण अपघात

  • दुर्घटनेत मुंबईतील २ जणांचा मृत्यू

  • एकूण १२ जण जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मुंबई-बंगळूर महामार्गावरील जांभूळवाडी येथील दरी पुलावर शनिवारी मध्यरात्री भीषण अपघात झाला. दोन ट्रक आणि दोन मोटारींच्या झालेल्या या अपघातात २ जणांचा मृत्यू झाला असून, तब्बल १२ जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

नेमकं काय घडलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास एक ट्रक साताऱ्याच्या दिशेने मुंबईकडे जात होता. जांभूळवाडी परिसरातील दरी पुलाजवळ ट्रक चालक प्रमोद विठ्ठल वाघ याचे वाहनावरील नियंत्रण अचानक सुटले. त्यामुळे त्याचा ट्रक त्याच लेनमधून पुढे जाणाऱ्या आयशर ट्रकवर जोरात आदळला. धडक इतकी भीषण होती की, दोन्ही ट्रक दुभाजक तोडून थेट साताऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर आले. त्याचवेळी समोरून येणाऱ्या एर्टिगा आणि टाटा अल्ट्रोझ या दोन मोटारींना ट्रकने जोरदार धडक दिली. काही क्षणांतच चार वाहनांचा भीषण अपघात झाला आणि घटनास्थळी मोठी खळबळ उडाली.

Mumbai Banglore Highway Accident News
Daughter Property Rights : मुलींना वडिलांच्या मालमत्तेत हिस्सा कधी मिळत नाही? काय आहेत नियम, जाणून घ्या

मृतांची नावे समोर

या दुर्घटनेत टाटा अल्ट्रोझमधील आनंदीबाई रामचंद्र वाडकर (वय ५०, रा. नेरूळ, नवी मुंबई) आणि हृदयनाथ मोहन गायकवाड (रा. जोगेश्वरी पूर्व, मुंबई) यांचा मृत्यू झाला. तर दोन्ही मोटारींसह इतर वाहनांमधील एकूण १२ जण जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच आंबेगाव पोलिस ठाण्याचे कर्मचारी, भारती विद्यापीठ वाहतूक विभागाचे पोलिस तसेच अग्निशमन दलाचे अधिकारी आणि कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

Mumbai Banglore Highway Accident News
NCMC Card चा रिचार्ज संपलाय? २ मिनिटात घरबसल्या ऑनलाईन रिचार्ज करण्यासाठी 'या' ६ स्टेप्स करा फॉलो

वाहतुकीवर परिणाम

बचावकार्य सुरू करून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले. दरम्यान, अपघातग्रस्त वाहने महामार्गाच्या मधोमध अडकल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्यात आली. त्यानंतर महामार्गावरील वाहतूक हळूहळू पूर्ववत करण्यात आली. या घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com