NCMC Card चा रिचार्ज संपलाय? २ मिनिटात घरबसल्या ऑनलाईन रिचार्ज करण्यासाठी 'या' ६ स्टेप्स करा फॉलो

Alisha Khedekar

ST प्रवाशांसाठी NCMC कार्ड अनिवार्य

ST बसने सवलतीच्या दरात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी 1 सप्टेंबरपासून NCMC कार्डचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे.

recharge ST NCMC card online from home | Saam tv

ऑनलाइन रिचार्ज

NCMC कार्डमधील रक्कम संपल्यास मोबाईल किंवा कॉम्प्युटरच्या मदतीने NCMC कार्ड घरबसल्या ऑनलाइन रिचार्ज करता येते.

recharge ST NCMC card online from home | Google

वेबसाइटला भेट द्या

रिचार्ज करण्यासाठी Google उघडा आणि mtpcardonline.nsdlpayment.bank.in या वेबसाइटवर जाऊन पुढील प्रक्रिया सुरू करा.

recharge ST NCMC card online from home | Google

मोबाईल नंबर टाका

वेबसाइटवर NCMC कार्ड काढताना नोंदवलेला मोबाईल नंबर टाका आणि Proceed पर्यायावर क्लिक करा.मोबाईलवर आलेला OTP संबंधित ठिकाणी टाका.

recharge ST NCMC card online from home | Google

Wallet Recharge निवडा

लॉगिन केल्यानंतर डाव्या बाजूला दिसणाऱ्या Wallet Recharge पर्यायावर क्लिक करा आणि रिचार्जची आवश्यक रक्कम निवडा.

recharge ST NCMC card online from home | Google

रक्कम निवडा

तुम्ही ₹50, ₹100, ₹200, ₹500, ₹1000, ₹2000 किंवा ₹3000 पैकी आवश्यक रिचार्ज रक्कम निवडू शकता.

recharge ST NCMC card online from home | Google

ऑनलाइन पेमेंट करा

Proceed To Pay आणि Confirm & Pay निवडल्यानंतर UPI, डेबिट किंवा क्रेडिट कार्डने पेमेंट करून रिचार्ज पूर्ण करा.

recharge ST NCMC card online from home | Google

NEXT : १५ दिवस काहीच खाल्लं नाही तर इतकं होईल वजन कमी, वेळीच व्हा सावध नाहीतर...

What Happens If You Eat Nothing For 15 Days | AI Image
येथे क्लिक करा