Mumbai Pollution
मुंबईच्या हवेचा स्तर दिवसेंदिवस खालावत चालला आहे. नुकताच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत मुंबई दुसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे मुंबईकारांसाठी हा चिंतेचा विषय असून आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. दरम्यान यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारचे वेगळ्याच शैलीत अभिनंदन केले आहे.
यासंदर्भात त्यांनी एक ट्विट करत, राज्याच्या राजधानीला सरकारने जगाच्या नकाशात मुंबईला दुसऱ्या क्रमांकाचे शहर बनवण्यासाठी मोलाचे योगदान दिले आहे. हा एक मोठा पराक्रम आहे. त्याबद्दल सरकारचे अभिनंदन, असे त्यांनी म्हटले आहे. सीएमओ आणि बीएमसीला त्यांनी टॅग करत हे ट्विट केलं आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
मुंबईतील हवेची गुणवत्ता मध्यम श्रेणीत नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. दरम्यान हवेचा स्तर दिवसेंदिवस खालावत असल्यामुळे आणि यासाठी उपाययोजना होत नसल्यामुळे राज्य सरकारवर टीका होत आहे. नुकताच मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी, मुंबईतील बांधकामाच्या ठिकाणी धूळ आणि प्रदूषण नियंत्रणाच्या उपायययोजनांकडे होत असलेले दुर्लक्षाची चांगलीच दाखल घेतली. बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी प्रदूषण नियंत्रणाच्या उपाययोजना करा अन्यथा बांधकामे रोखण्याचा इशारा दिला होता.
दरम्यान मुंबईकरांना आता आरोग्याच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. सर्दी खोकला, घसा खवखवणे या सारख्या समस्या वाढल्या आहेत. हृदय, फुफ्फुसाचे विकार बळावण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.