Dasara Melava 2023: शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याच्या मंचावर बाळासाहेबांची खुर्ची, 'त्या' खुर्चीचं उद्धव ठाकरेंशी कनेक्शन काय?

Dasara Melava 2023: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसैनिकांना काय भावनिक साद घालणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
Dasara Melava 2023:
Dasara Melava 2023:Saam tv
Published On

रुपाली बडवे

Dasara Melava News:

Dasara Melava: एकनाथ शिंदे गटाने दसरा मेळाव्यासाठी जय्यत तयारी केली आहे. हजारोंच्या संख्येने शिंदे गटाचे कार्यकर्ते मेळाव्यासाठी आझाद मैदानावर पोहोचू लागले आहेत. विशेष म्हणजे शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याच्या मंचावर बाळासाहेबांची खुर्ची ठेवली जाणार आहे. या खुर्चीत बसून 'माझ्या उद्धवला सांभाळा' असे भावनिक आवाहन बाळासांहेबांनी शिवसैनिकांना केलं होतं. बाळासाहेबांची हीच खुर्ची स्टेजवर ठेवत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसैनिकांना काय भावनिक साद घालणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. (Latest Marathi News)

गेल्या अनेक दिवसांपासून शिंदे गटाची दसरा मेळाव्याची कार्यकर्त्यांना उत्सुकता होती. शिंदे गटाचा आझाद मैदान येथे होणाऱ्या दसरा मेळाव्याला अवघे काही तास उरले आहेत.

या मेळाव्यासाठी राज्यभरातून शिंदे गटातील हजारो शिवसैनिक बस ,ट्रेन ,खासगी वाहनांनी आझाद मैदानात पोहोचू लागले आहेत. या दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाने चोख नियोजन केल्याचं दिसून येत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Dasara Melava 2023:
Ashok Chavan News: मराठा समाजात फूट पाडू नका; आरक्षणाच्या मुद्द्यावरून अशोक चव्हाण यांचा रोख कुणाकडे?

शिंदे गटाने दसरा मेळाव्याच्या बाळासाहेबांची खुर्ची ठेवली जाणार आहे. याच खुर्चीवरून बाळासाहेब ठाकरे यांनी ठाण्यात 2012 साली शेवटचे भाषण केलं होतं. ती खुर्ची आठवण म्हणून ठाण्यातील बाळासाहेब ठाकरे कलादालनात ठेवण्यात आली होती.

Dasara Melava 2023:
Dhananjay Munde News: दसरा मेळाव्याच्या माध्यमातून जनतेच्या हिताचा विचार करावा; धनंजय मुंडे यांनी मांडले मत

गेल्या वर्षी 'एमएमआरडीए' मैदानात झालेल्या दसरा मेळाव्यात हीच खुर्ची ठेवण्यात आली होती. याही वर्षी बाळासाहेबांची आठवण म्हणून ही खुर्ची ठेवली जाणार आहे. ही खुर्ची ठेवून शिवसैनिकांना भावनिक साद घालण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचं बोललं जात आहे.

महत्त्वाचे म्हणजे याच खुर्चीत बसून बाळासाहेब ठाकरे यांनी 'माझ्या उद्धवला सांभाळा' असे भावनिक आवाहन शिवसैनिकांकडे केलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com