Ashok Chavan News: मराठा समाजात फूट पाडू नका; आरक्षणाच्या मुद्द्यावरून अशोक चव्हाण यांचा रोख कुणाकडे?

Ashok Chavan News: 'राजकीय मंडळींनी वेगवेगळी विधान करुन मराठा समाजात फूट पाडू नका, असं वक्तव्य अशोक चव्हाण यांनी केलंय.
Ashok Chavan
Ashok ChavanSaam tv
Published On

संजय सूर्यवंशी

Ashok Chavan News:

मराठा आरक्षणावरून राज्याचं राजकारण पेटलं आहे. मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपोषणाचा इशारा दिला आहे. याच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आता राजकीय नेत्यांकडून वेगवेगळी विधाने केली जात आहेत. याचदरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मोठं भाष्य केलं आहे.

'राजकीय मंडळींनी वेगवेगळी विधान करुन मराठा समाजात फूट पाडू नका, असं वक्तव्य अशोक चव्हाण यांनी केलंय. (Latest Marathi News)

नांदेड जिल्ह्यातील येळेगाव येथील भाऊराव चव्हाण साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचे शुभारंभ आज अशोक चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आलं. या कार्यक्रमात अशोक चव्हाण यांनी उपस्थितांशी संवाद साधला.

या कार्यक्रमात अशोक चव्हाण म्हणाले, '९६ कुळी मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र नको अशी भूमिका काही नेत्यांनी मांडली. मराठा आरक्षणावरून काही राजकीय मंडळी वेगवेगळी विधाने करत आहेत. या प्रकारची विधाने करुन माराठा समाजात फूट पाडू नका. तुम्हाला माझी हाथ जोडून विनंती आहे'. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Ashok Chavan
Sushilkumar Shinde: सोलापूर लोकसभेला काँग्रेसचा उमेदवार कोण? धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त सुशीलकुमार शिंदे यांची मोठी घोषणा

'तुम्हाला जे बोलायचं, ते दिल्लीत जाऊन बोला. इथे बोलू नका. केंद्राला सांगा कायदा बदलण्यासाठी सांगा, असं आवाहन अशोक चव्हाण यांनी केलं.आरक्षणाचा प्रश्न प्रामाणिकपणे सोडवायचा असेल तर केंद्राने पुढाकार घेतला पाहिजे, राज्याच्या हाती काहीच नाही, असं अशोक चव्हाण म्हणाले.

Ashok Chavan
Pankaja Munde Dasara Melava: निवडणुकीत पडले ते झालं, आता पाडणार; भगवान गडावरून पंकजा मुंडेंच्या निशाण्यावर कोण?

मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी अशोक चव्हाणांना दाखवले काळे रुमाल

दरम्यान, काँगेस नेते अशोक चव्हाण यांच्या कार्यक्रमात काळे रुमाल दाखवून 'एक मराठा लाख मराठा' अशा घोषणा देण्यात आल्या. घोषणा देणाऱ्या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.

नांदेड जिल्हयातील येळेगाव येथील भाऊराव चव्हाण साखर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या शुभारंभ कार्यक्रमात अशोक चव्हाण यांचं भाषण सुरू होताच काही कार्यकर्त्यांनी काळे रुमाल दाखवले. तसेच या कार्यकर्त्यांनी त्यांना काळे रुमाल दाखवून मराठा आरक्षणाच्या घोषणा दिल्या. मराठा आरक्षणासाठी राजीनामा द्यावा, अशी मागणी घोषणा देणाऱ्या युवकांनी केली.

Ashok Chavan
Nilesh Rane News : निलेश राणेंचा राजकारणाला 'जय महाराष्ट्र'; दसऱ्याच्या दिवशी मोठी घोषणा

मराठा आरक्षणासाठी कार्यकर्ते आक्रमक

मराठा आरक्षणाच्या मागणीाठी गाव बंदीचे लोन आता शहरापर्यंत पोहचले आहे. नांदेड शहरात असलेल्या सांगवी या भागात मराठा समाजाने गाव बंदीचा फलक लावला आहे. 'एक मराठा लाख मराठा' अशा घोषणा देत मराठा युवकांनी सांगवीमध्ये राजकीय नेत्यांना बंदी घातली आहे.

'मराठा आरक्षण जो पर्यंत मिळणार नाही, तोपर्यंत सांगवी भागात सर्वच पक्षातील नेत्यांना गाव बंदी असल्याची भूमिका मराठा समाजाने घेतली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com