Accident News : राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचा थरार, भरधाव ट्रकची रिक्षाला धडक; दोघांचा जागीच मृत्यू

Mumbai-Agra National Highway Accident : मुंबई-आग्रा महामार्गावर शिरपूरजवळ भरधाव आयशर ट्रकने रिक्षाला धडक दिल्याने दोन जणांचा मृत्यू झाला असून ५-६ जण जखमी झाले आहेत. या अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली.
Accident News : राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचा थरार, भरधाव ट्रकची रिक्षाला धडक; दोघांचा जागीच मृत्यू
Mumbai-Agra National Highway AccidentSaam Tv
Published On
Summary
  • मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात

  • ट्रक-रिक्षा धडकेत दोन जण ठार

  • ५-६ प्रवासी गंभीर जखमी

  • शिरपूरजवळ घटना, वाहतूक विस्कळीत

  • पोलिसांकडून तपास सुरू

Mumbai-Agra National Highway Shirpur Accident मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर एक भीषण रस्ता अपघात झाला आहे. धुळ्याहून मध्यप्रदेशकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या एका मालवाहू आयशर ट्रकने पॅसेंजर रिक्षाला जोरदार धडक दिली. या धडकेत दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मनीषा राजेंद्र पाटील आणि बंटी किसन जाधव असे अपघातात मृत झालेल्या दोघांची नवे आहेत. तसेच या दुर्घटनेत ५ ते ६ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, शिरपूर (Shirpur) जवळील मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर चोपडा फाटा परिसरातील आरती हॉटेलजवळ (Aarti Hotel) सदर अपघात घडला. धुळ्याहून मध्यप्रदेशकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या एका मालवाहू आयशर ट्रकने पॅसेंजर रिक्षाला जोरदार धडक दिली. या अपघाताची तीव्रता इतकी भयंकर होती की, या आयशरने रिक्षाला अक्षरशः चिरडले आणि रिक्षाचा चेंदामेंदा झाला.

Accident News : राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचा थरार, भरधाव ट्रकची रिक्षाला धडक; दोघांचा जागीच मृत्यू
Crime News : कर्ज घेतल्याचा फायदा घेतला, पैसे फेडेपर्यंत महिलेवर ३ वर्षे लैंगिक अत्याचार; कोल्हापूर हादरले

या धडकेनंतर रिक्षामधील प्रवासी रस्त्यावर फेकले गेले, ज्यामध्ये मनीषा राजेंद्र पाटील आणि बंटी किसन जाधव यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या भीषण घटनेत रिक्षामधील अन्य ५ ते ६ जण जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच स्थानिक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

Accident News : राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचा थरार, भरधाव ट्रकची रिक्षाला धडक; दोघांचा जागीच मृत्यू
Political News : भाजप नेत्याला मोठा दिलासा, बलात्कार प्रकरणात कोर्टाकडून क्लीन चिट; नेमकं काय घडलं होतं?

दुर्घटनेत जखमी झालेल्या सर्व प्रवाशांना तातडीने पुढील उपचारासाठी शिरपूर येथील उपजिल्हा रुग्णालय आणि स्थानिक खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली असल्याचे दिसून आले. तसेच घटनास्थळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com