मुंबईत ८२ इमारती अतिधोकादायक; २७३६ रहिवाशांचे जीव धोक्यात

MHADA Cessed Buildings Evacuation Notice Mumbai: मुंबईत पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ८२ उपकरप्राप्त इमारती अतिधोकादायक घोषित केल्या आहेत. २७३६ रहिवाशांचे जीव धोक्यात असून म्हाडाने तातडीने इमारती रिक्त करण्याचे आवाहन केले आहे.
Dilapidated cessed buildings in Mumbai marked as dangerous by MHADA ahead of the monsoon season.
Dilapidated cessed buildings in Mumbai marked as dangerous by MHADA ahead of the monsoon season.saam tv
Published On

संजय गडदे, साम टीव्ही

पावसाळ्याच्या तोंडावर म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाने मुंबई शहर बेटावरील उपकरप्राप्त जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतींचे सर्वेक्षण पूर्ण केले असून यंदा तब्बल ८२ इमारती अतिधोकादायक घोषित करण्यात आल्या आहेत. यामध्ये मागील वर्षी धोकादायक ठरलेल्या ४३ इमारतींचाही समावेश आहे.

Dilapidated cessed buildings in Mumbai marked as dangerous by MHADA ahead of the monsoon season.
Pune News: पुण्यात धक्कादायक घटना, विषारी दारूमुळे १८ जणांचा दुर्दैवी मृत्यू; परिसरात खळबळ

गिरगाव, काळबादेवी, माझगाव, नागपाडा, कामाठीपुरा, दादर, माहिम आणि एलफिन्स्टन परिसरातील अनेक जुन्या इमारतींचा या यादीत समावेश आहे. या इमारतींमध्ये एकूण २२५६ निवासी आणि ४८० अनिवासी गाळेधारक असे मिळून २७३६ भाडेकरू आणि रहिवासी वास्तव्यास आहेत. म्हाडाकडून आतापर्यंत १७६ निवासी गाळेधारकांना इमारती रिक्त करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यापैकी २९ कुटुंबांना संक्रमण शिबिरात स्थलांतरित करण्यात आले असून ३६ कुटुंबांनी स्वतः पर्यायी निवासाची व्यवस्था केली आहे. उर्वरित रहिवाशांना लवकरात लवकर इमारती रिक्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Dilapidated cessed buildings in Mumbai marked as dangerous by MHADA ahead of the monsoon season.
Nalasopara: आई-वडिलांची नजर चुकली, अन् चिमुकला स्विमिंग पूलमध्ये बुडाला; मन विचलित करणारा VIDEO

तसेच, सुमारे २१०२ रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी संक्रमण शिबिरात व्यवस्था करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती म्हाडाने दिली. पावसाळ्यात दुर्घटना टाळण्यासाठी रहिवाशांनी प्रशासनाला सहकार्य करावे आणि धोकादायक इमारती तातडीने रिक्त कराव्यात, असे आवाहन म्हाडाने केले आहे.दरम्यान, कोणतीही दुर्घटना किंवा इमारतीत धोक्याची चिन्हे आढळल्यास तात्काळ म्हाडा आणि मुंबई महानगरपालिकेच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com