मोठा निर्णय! मुंबईच्या ३ बड्या IAS अधिकाऱ्यांना अचानक राज्याबाहेर धाडलं; महत्त्वाची जबाबदारी सोपवली, कारण काय?

Mumbai Ias Officers Transferred Election Duty India: मुंबईतील तीन वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांची निवडणूक आयोगाकडून अचानक बदली करण्यात आली आहे. आसाम, पश्चिम बंगाल आणि केरळमध्ये त्यांना महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली असून निष्पक्ष आणि शांततापूर्ण निवडणुका पार पाडण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
Senior Mumbai officers deputed to Assam, West Bengal, and Kerala to oversee election security and law enforcement.
Senior Mumbai officers deputed to Assam, West Bengal, and Kerala to oversee election security and law enforcement.Saam Tv
Published On

मुंबई पोलीसमध्ये कार्यरत असलेले तीन बड्या अधिकाऱ्यांची निवडणूक आयोगाने दुसऱ्या राज्यात बदली केली आहे. निवडणुकीमध्ये कायदा आणि सुव्यवस्था तसेच निष्पक्ष निवडणूक पार पडावी यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले जात आहे. मुंबई पोलीस दलात आज मोठी खलबळ उडाली असून शहराची सुरक्षा आणि गुन्हेगारांवर वचक ठेवणारे सर्वात शक्तिशाली तीन अधिकाऱ्यांचे संवेदनशील राज्यांमध्ये बदली केली आहे. यामध्ये गुन्हे शाखेतील सहआयुक्त लक्ष्मी गौतम, सहआयुक्त जय कुमार आणि सहआयुक्त डॉ. आरती सिंग यांचा समावेश आहे. एप्रिलमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका लक्षात घेता. निवडणुका आयोगाने त्यांची संवेदनशील राज्यामध्ये बदली केली आहे.

Senior Mumbai officers deputed to Assam, West Bengal, and Kerala to oversee election security and law enforcement.
Pune Local Mega Block: पुणेकरांसाठी मोठी बातमी! आज दिवसभर रेल्वेचा मेगाब्लॉक; पुणे- लोणावळा लोकल रद्द; वाचा सविस्तर..

कोणाला कुठे जबाबदारी मिळाली?

मुंबई गुन्हे शाखेचे लक्ष्मी गौतम यांची आसाममध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणुकीच्या तयारीवर देखरेख ठेवण्यासाठी 18 मार्च ते 9 एप्रिलपर्यंत ते तिथे असतील. दरम्यान जय कुमार यांची पश्चिम बंगालमध्ये या आव्हानात्मक राज्यात बदली करण्यात आली आहे. पश्चिम बंगालमध्ये निवडणूक दोन टप्प्यांत होत असल्याने ते देखील एप्रिल अखेर पर्यंत बंगालमध्ये असणार आहे. गुप्तचर विभागाच्या प्रमुख डॉक्टर आरती सिंग यांना केरळला पाठवण्यात आले आहे. सुरक्षा व्यवस्थेवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी त्या 18 मार्च ते 9 एप्रिल या कालावधीत केरळमध्ये असतील.

Senior Mumbai officers deputed to Assam, West Bengal, and Kerala to oversee election security and law enforcement.
Mumbai Pune Expressway accident : मुंबई-पुणे एक्सप्रेसवर पुन्हा अपघात, खालापूरजवळ कारचा चेंदामेंदा अन् रक्ताचा सडा, ३ जणांचा मृत्यू

निवडणुकीदरम्यान वेगवेगळ्या राज्यांमधून पोलीस कर्मचारी तैनात करण्याची एक जुनी परंपरा आहे. यामागे दोन मुख्य कारणे आहेत. पहिले निवडणुकांसाठी अधिक पोलीस दलाची आवश्यकता असते. त्यामुळे मनुष्यबळाची गरज भागवण्यासाठी इतर राज्यांमधून पोलीस अधिकारी आणि हवालदार आणले जातात. दुसरे म्हणजे ज्या राज्यात निवडणुका होत आहेत, त्या ठिकाणी निष्पक्ष निवडणुका आणि सुनिश्चित करण्यासाठी इतर राज्यांतील पोलीस कर्मचाऱ्यांची गरज असते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com