Badlapur News : बदलापुरात व्यवसाय करणाऱ्या मराठी महिलेला त्रास, परप्रांतीय महिला व्यावसायिकांना मनसे स्टाईल दणका

Badlapur News today : बदलापुरात व्यवसाय करणाऱ्या मराठी महिलेने परप्रांतीय महिला व्यावसायिकांनी त्रास दिल्याचा आरोप केला. त्यानंतर या परप्रांतीय महिला व्यावसायिकांना मनसेने दणका दिला.
बदलापुरात व्यवसाय करणाऱ्या मराठी महिलेला त्रास, परप्रांतीय महिला व्यावसायिकांना मनसे स्टाईल दणका
Badlapur NewsSaam tv
Published On

बदलापूर : बदलापुरात स्थानिक व्यावसायिक आणि परप्रांतीय व्यावासायिक असा वाद उफाळून आला आहे. बदलापुरात व्यवसाय करणाऱ्या मराठी महिलेने व्यवसाय करताना परप्रांतीय महिला व्यावसायिकांनी त्रास दिल्याचा आरोप केला. या मराठी महिला व्यावसायिक आणि परप्रांतीय महिला व्यावसायिकांच्या वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर या परप्रांतीय महिला व्यावसायिकांना मनसेने दणका दिला आहे.

नेमकं काय घडलं?

बदलापूर पश्चिम भागात एक मराठी महिला अंडा भुर्जीचा व्यवसाय करते. गेल्या दोन महिन्यापासून ही मराठी महिला व्यवसाय करते. या महिलेच्या शेजारी दोन परप्रांतीय महिला अनेक दिवसांपासून त्रास देत आहेत, असा मराठी महिला व्यावसायिकेचा आरोप आहे. याबाबत मराठी महिला व्यावसायिकेने मनसेच्या कार्यालयात जाऊन संगिता चेंदवणकर यांना आपली व्यथा सांगितली.

बदलापुरात व्यवसाय करणाऱ्या मराठी महिलेला त्रास, परप्रांतीय महिला व्यावसायिकांना मनसे स्टाईल दणका
Badlapur: लोकल अर्धातास उशिरा; बदलापूर रेल्वे स्थानकात प्रवाशांची गर्दी!

मराठी महिला व्यावसायिकेची व्यथा ऐकल्यानंतर संगिता चेंदवणकर यांनी मनसे कार्यकर्त्यांना घेऊन परप्रांतीय महिलांच्या धंद्यावर धडक दिली. त्यांनी परप्रांतीय महिलांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर तुमच्या बाजूला धंदा करत असलेल्या मराठी महिलेला त्रास देऊ नका, यावेळी परप्रांतीय महिलांनी संगिता चेंदवणकर यांना उडवाउडवीची उत्तर दिली. तेव्हा मनसे कार्यकर्त्यांनी खळखट्याक करत परप्रांतीय महिलांना येथे धंदा करू नका, निघून जा आणि त्यांची हातगाडी उलटी करण्याचा प्रयत्न केला.

बदलापुरात व्यवसाय करणाऱ्या मराठी महिलेला त्रास, परप्रांतीय महिला व्यावसायिकांना मनसे स्टाईल दणका
Rain Alert : उल्हास नदीने इशारा पातळी गाठली; बदलापूर आणि नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

बदलापुरातील या प्रकारावर स्थानिक नागरिकांमध्ये उलटसुलट प्रतिक्रिया उमटू लागल्या आहे. दरम्यान, बदलापुरात परप्रांतीय फेरीवाल्यांची मुजोरी वाढल्याचा आरोप मनसेचा आरोप आहे. तसेच त्यांच्याकडून मराठी फेरीवाल्यांना धंदा करताना प्रचंड त्रास देत असल्याचे दिसून येत आहे. तसेच मराठी फेरीवाल्यांना व्यवसाय करताना प्रचंड त्रास देत असल्याचाही मनसेचा आरोप आहे.

Edited By - Vishal Gangurde

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com