Rain Alert : उल्हास नदीने इशारा पातळी गाठली; बदलापूर आणि नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Badlapur Rain News : उल्हास नदीची पातळी 16.10 असून कोणत्याही क्षणी पात्राबाहेर पडू शकते. त्यामुळे बदलापूर आणि नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
Rain Alert
Rain Alert Saam Digital
Published On

रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे उल्हास नदीने इशारा पातळी गाठली आहे. नदी काठोकाठ भरून वाहात आहे. कोणत्याही क्षणी नदी धोक्याची पातळी गाठू शकते, त्यामुळे बदलापूर आणि नदीकाठावरील गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सध्या उल्हास नदीची पातळी 16.10 असून 16.70 धोका पातळी आहे. पाणी पातळी वाढतचं असून पाऊस असाच सुरू राहिला नदी पात्राबाहेर पडू शकते. सध्या नदी जवळील खेळणी आणि जिमचे साहित्य पाण्याखाली गेलं आहे.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर दीड फुटांपर्यंत पाणी साचलं आहे. या पाण्यातूनच वाहनांना मार्ग काढावा लागत आहे. खोपोलीजवळ बोरघाटात अमृतांजन पूल परिसरात रस्त्यावर पाणी साचलं आहे. मुंबईकडे येणाऱ्या लेनवर इथं सखल भाग असल्याने पाणी साचले असून वाहनांना पुढं येताना खूप कसरत करावी लागते आहे. वाहन चालकांना मार्गदर्शन करण्यासाठी वाहतूक पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

मुंबई गोवा महामार्ग लगत असणाऱ्या चिंचवली येथील चिंचवली बोरघर मार्ग देखील पाण्याखाली गेला आहे. संततदार कोसळणाऱ्या पावसामुळे नदीला पूर आला आहे. यामुळे चिंचवली गावाचा खेड तालुक्यातील इतर गावांची संपर्क पूर्णपणे तुटला असून खेड तालुका प्रशासन यावर लक्ष ठेवून आहे.

Rain Alert
Bhiwandi Rain Video: भिवंडीत तुफान पाऊस, रस्त्यांना नदीचे स्वरूप; अनेक घरामध्ये शिरले पाणी

रत्नागिरीत शिवतर गावातील गेला वाहून

मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यात सध्या दरड किंवा रस्ता खचण्याच्या घटना घडत आहेत. खेड तालुक्यातील शिवतर गावातील नामदरेवाडीकडे जाणारा रस्ता वाहून गेला आहे. त्यामुळे या वाडीतील ग्रामस्थांची गैरसोय झाली आहे. मुसळधार पावसामुळे सध्या जिल्ह्यात ठिकठिकाणी पाणी साचने रस्ते वाहून जाण्याच्या घटना घडल्या आहेत.

Rain Alert
Mumbai Dam Water Level: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ, पाहा आजची ताजी आकडेवारी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com