Bhiwandi Rain Video: भिवंडीत तुफान पाऊस, रस्त्यांना नदीचे स्वरूप; अनेक घरामध्ये शिरले पाणी

Heavy Rainfall In Bhiwandi : भिवंडीमध्ये रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे शहरातील प्रमुख ठिकाणांवर गुडघाभर पाणी साचले आहे. तर रस्त्यांना नदीचे स्वरूप आले आहे. अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.
Bhiwandi Rain Video: भिवंडीत तुफान पाऊस, रस्त्यांना नदीचे स्वरूप; अनेक घरामध्ये शिरले पाणी
Bhiwandi RainSaam Tv
Published On

फैय्याज शेख, भिवंडी

भिवंडीमध्ये तुफान पाऊस (Heavy Rainfall In Bhiwandi) पडत आहे. या पावसामुळे भिवंडीतील अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. भिवंडी शहरातील प्रमुख ठिकाणांवर गुडघाभर पाणी साचले आहे. तर रस्त्यांना नदीचे स्वरूप आले आहे. त्यामुळे वाहन चालकांसह प्रवाशांचे देखील हाल होताना दिसत आहे. या पावसामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. त्यामुळे नागरिकांच्या संसार उपयोगी वस्तूंचे नुकसान झाले आहे.

भिवंडी शहरात रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे. या पावामुळे भिवंडी शहरातील मुख्य भाजी मार्केट, बाजारपेठ, तीनबत्ती, नजराणा सर्कल, छत्रपती शिवाजी महाराज चौकात पाणी साचले आहे. याठिकाणी अडीच ते तीन फुटांपर्यंत पाणी साचले आहे त्यामुळे शहरातील मुख्य रहदारीचा रस्ता बंद पडला होता. यासह ईदगाह झोपडपट्टी, कामवारी नदी किनारी असलेली म्हाडा कॉलनी या संपूर्ण परिसरात चार फुटांपर्यंत पाणी साचले आहे. नागरिकांना या पाण्यातून वाट काढावी लागत आहे.

Bhiwandi Rain Video: भिवंडीत तुफान पाऊस, रस्त्यांना नदीचे स्वरूप; अनेक घरामध्ये शिरले पाणी
Mumbai Rain Alert : मुंबईला पावसाचा तडाखा, पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचा खोळंबा

सकाळपासून भिवंडीमध्ये पूरजन्य परिस्थिती असताना भिवंडी महापालिका आपत्कालीन व्यवस्थापन या ठिकाणी नागरिकांच्या मदतीसाठी आलेले नव्हते. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केलेला आहे. तर शहरालगत वाहणाऱ्या कामवारी नदीच्या पाणी पातळीमध्ये देखील वाढ झाली आहे. जर पावसाचा जोर वाढत राहिल्यास पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते अशी भीती व्यक्त केली जात आहे.

Bhiwandi Rain Video: भिवंडीत तुफान पाऊस, रस्त्यांना नदीचे स्वरूप; अनेक घरामध्ये शिरले पाणी
IMD Rain Alert : पालघर, रायगड, ठाण्यात मुसळधार पावसासह ५५ किमी वेगाने वाहणार वारे; समुद्राला भरती, ३.२४ मीटर उंचीच्या उसळणार लाटा

दरम्यान, मुसळधार पावसामुळे कल्याण तालुक्यातील काळू नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे. कालपासून सुरू असलेल्या पावसाची संततधार अजूनही सुरुच आहे. सध्या पाण्याचा प्रवाह पुलावरून ओसंडून वाहत आहे. कल्याण तालुक्यातील टिटवाळाजवळचा रुंदे पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे रुंदा, उशिद, मढ, आरेले, भोंगाळपाडा इत्यादी गावातील स्थानिकांनी या पुलावरून वाहतूक करू नका अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. त्याचसोबत नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Bhiwandi Rain Video: भिवंडीत तुफान पाऊस, रस्त्यांना नदीचे स्वरूप; अनेक घरामध्ये शिरले पाणी
Mumbai Rain: मुंबईसह, पुण्यात पहाटेपासूनच मुसळधार पाऊस; लोकल सेवा धीम्या गतीने, प्रवाशांची मोठी तारांबळ VIDEO

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com