

विरारमध्ये मराठी भाषेबाबत तरुणाने आक्षेपार्ह विधान केलं
मनसे कार्यकर्त्यांनी तरुणाला धडा शिकवला
मनसे कार्यकर्त्यांनी तरुणाला चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिलं
डी-मार्ट चौक परिसरात काही काळ तणावाचे वातावरण
विरारमध्ये मराठी भाषेबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या एका तरुणाला मनसेच्या कार्यकर्त्यांनी चांगलाच धडा शिकवला. विरारच्या डीमार्ट परिसरात या तरुणाने मराठी भाषेचा द्वेष करत स्थानिकांना दमदाटी करत धमकी दिली होती. या घटनेची माहिती मिळताच मनसे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेत या तरुणाला चांगलाच चोप दिला. त्यानंतर त्याला अर्नाळा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं.
मिळालेल्या माहितीनुसार, मराठी भाषेबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करत गावकऱ्यांना दमदाटी केल्याचा आरोप असलेल्या एका तरुणाला मनसेच्या कार्यकर्त्यांनी चांगला चोप देत धडा शिकवला. त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात दिल्याची घटना समोर आली आहे. विरार पश्चिमेतील डी-मार्ट चौक परिसरात परिसरात ही घटना घडली. मनसेने पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या तरुणाला चांगलीच अद्दल घडवली.
हा तरुण मराठी भाषेचा द्वेष करत होता. तसंच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला फाट्यावर मारतो, असे वक्तव्य करत परिसरातील काही नागरिकांना हा दमदाटी करत होता. ही बाब समजताच मनसेचे स्थानिक पदाधिकारी अमोल पवार यांनी घटनास्थळी धाव घेत संबंधित तरुणाला जाब विचारला. त्याला मनसे स्टाईलने चांगला चोप देण्यात आला. त्यांतर त्याला जवळील अर्नाळा पोलिस ठाण्यात नेऊन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे परिस्थिती नियंत्रणात आली. मनसे कार्यकर्त्यांकडून 'महाराष्ट्रात राहून मराठी माणूस आणि राज्याच्या प्रतिमेचा अपमान सहन केला जाणार नाही. ज्या ठिकाणी राहता, तेथील भाषा आणि स्थानिकांचा सन्मान करावा.', असा इशारा मनसेने दिला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.