Marathi Director: मराठी चित्रपटसृष्टीतील चर्चेत असलेले दिग्दर्शक संतोष डावखर सध्या एका खास कारणामुळे सोशल मीडियावर ट्रेंडीगमध्ये आहेत. आपल्या गाजलेल्या मराठी चित्रपट 'गोंधळ'च्या यशानंतर संतोष डावखर यांनी एकाच दिवशी तब्बल चार आलिशान लक्झरी कार्स खरेदी केल्या आहेत. त्यांच्या या खास खरेदीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहत्यांकडून त्यांचे कौतुक होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संतोष डावखर यांनी रेंज रोव्हर, लँड रोव्हर डिफेंडर, बीएमडब्ल्यू आणि बीवायडी सीलायन या महागड्या आणि प्रीमियम गाड्या एकाच दिवशी आपल्या खरेदी केल्या आहेत. विशेष म्हणजे, डावखर यांच्याकडे याआधीच एक आलिशान मेबाख कार असून, आता त्यांच्या लक्झरी कार कलेक्शनमध्ये आणखी भर पडली आहे. मराठी सिनेसृष्टीतील दिग्दर्शकाकडून अशी मोठी खरेदी क्वचितच पाहायला मिळते.
ही खरेदी त्यांच्या ‘गोंधळ’ चित्रपटाच्या यशाशी जोडली जात आहे. ‘गोंधळ’ या मराठी सिनेमाला देश-विदेशात मोठी दाद मिळाली आहे. चित्रपटाने केवळ बॉक्स ऑफिसवरच नव्हे तर पुरस्कारांच्या व्यासपीठावरही आपली छाप पाडली आहे. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘गोंधळ’ला मानाचे पुरस्कार मिळाले असून, मराठी सिनेमासाठी हा मोठा सन्मान आहे.
याशिवाय, ‘गोंधळ’चे ओटीटी राइट्स मोठ्या रकमेवर विकले गेल्याची चर्चाही रंगली आहे. जरी याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसली, तरी या डीलमुळेच डावखर यांनी ही मोठी खरेदी केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. लवकरच ‘गोंधळ’ कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार याची घोषणा होईल. यासह गोंधळ २ हा चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. एकूणच, संतोष डावखर यांचा हा यशस्वी प्रवास आणि एकाच दिवशी केलेली लक्झरी कार खरेदी मराठी चित्रपटसृष्टीत चर्चेचा विषय ठरत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.