'आमचा उपचार माहितच असेलच'....; मराठीचा विरोध करणाऱ्यांविरोधात मनसेची कडक भूमिका

MNS Aggressive Over Anti-Marathi: मुंबईतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मनसेने मराठीविरोधी भूमिकांविरोधात कडक भूमिका घेतली आहे. अविनाश जाधव यांनी ऑटो युनियन्सना गंभीर इशारा दिला आहे.
MNS Aggressive Over  Anti-Marathi:
MNS leader Avinash Jadhav issues warning amid Marathi language controversy in Mumbai.saam tv
Published On
Summary
  • मराठीविरोधात भूमिका घेणाऱ्यांवर मनसे आक्रमक

  • मुंबईत तणाव वाढण्याची शक्यता

  • मराठी सक्तीविरोधात काही रिक्षा संघटनांनी घेतलेल्या भूमिकेमुळे हा वाद निर्माण झाला

मराठी सक्तीविरोध करणाऱ्याविरुद्धात मनसेनं आक्रमक झाली आहे. संप पुकारणाऱ्या मुंबई ऑटोरिक्षाव संघटनेनेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं गंभीर इशारा दिला आहे. खोटे आकडे देऊन मराठी विरोध करण्याचा प्रयत्न करू नका, नाहीतर आम्ही आहोत, असा इशारा मनसे नेते अविनाश जाधव यांनी दिला आहे. अविनाश जाधव यांनी रिक्षा चालकांची खरी आकडेवारी दाखवत संघटनेनेच्या इशाऱ्याची हवा काढून टाकली आहे.

महाराष्ट्र सरकारने १ मे पासून रिक्षा चालक आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य केली आहे. रिक्षा चालक आणि ऑटो चालकाचा परवाना हवा असेल तर त्यांना मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. मराठी भाषा येणार नसेल तर त्यांचा परवाना रद्द होईल,असा निर्णय सरकारनं घेतला आहे. महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयाविरोधात मात्र मुंबई ऑटोरिक्षा मेन्स युनियनने संपाचा एल्गार पुकारला आहे. वकील गुणरत्न सदावर्ते यांनीही आंदोलनाचा इशारा दिला आहे.

MNS Aggressive Over  Anti-Marathi:
खासगी अनुदानित शाळांतील शिक्षक-शिक्षकेतर भरती प्रक्रियाही होणार ऑनलाईन, संस्थापकांची मनमानीला लगाम

दुसरीकडे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या मंत्रालयातील दालनात मराठी भाषा सक्तीबाबत बैठक सुरू आहे. १ मे पासून संपूर्ण राज्यभरातील टॅक्सी आणि रिक्षा चालकांसाठी मराठी सक्तीच्या निर्णयावरून ही बैठक सध्या सुरू आहे. या बैठकीत मंत्री प्रताप सरनाईक परिवहन आयुक्त नार्वेकर तसेच इतर रिक्षाचालक टॅक्सी चालक संघटनेचे काही पदाधिकारी उपस्थित आहेत.

MNS Aggressive Over  Anti-Marathi:
मराठी सक्तीविरोधात परप्रांतीयांची मुजोरी, मराठी रिक्षाचालकही आक्रमक

मुंबई ऑटोरिक्षा मेन्स युनियनने सरकारच्या या निर्णयाविरोधात बंड पुकारला आहे. ४ मे पासून राज्यातील १५ लाख रिक्षाचालक संपावर जाणार असल्याचा इशारा दिला आहे. या आंदोलनामुळे सेवा विस्कळीत होण्याची आणि रस्त्यांवरील रिक्षांची संख्या लक्षणीयरीत्या घटण्याची शक्यता संघटनेने वर्तवलीय.

यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अविनाश जाधव यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. अविनाश जाधव यांनी संघटनेनेवर हल्लाबोल केला आहे. मुंबई आणि ठाणे भागातील रिक्षा चालकांची आकडेवारी देत युनियनच्या इशाऱ्याची हवाच काढून टाकली आहे.

मुंबई ऑटोरिक्षा मेन्स युनियनने दिलेली रिक्षा चालकांची १५लाखांची आकडेवारी चुकीची आणि खोटी असल्याचं अविनाश जाधव म्हणालेत. मुंबई- ठाण्यात फक्त ४ लाख रिक्षाचालक आहेत. यात ६० ते ६५ टक्के मराठी रिक्षाचालक आहेत. त्यामुळे खोटे आकडे सांगून मराठी विरोध करण्याचा प्रयत्न करून नये. नाहीतर आम्ही आहोत, आमचा उपचार माहित असेलच. शिस्तीत मराठी बोला असं अविनाश जाधव यांनी आपल्या एका सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com