

भुषण शिंदे
Raj Thackeray news: सध्या सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे रील्सस्टारची क्रेझ खूप वाढली आहे. राज्यभरातील याच रील्सस्टार तरुणांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मार्गदर्शन केलं. 'तुम्ही जे करत आहात,ती फार महत्वाची आणि जबाबदारीची गोष्ट आहे, असं म्हणत राज ठाकरे यांनी रील्सस्टार तरुणांना मोलाचं मार्गदर्शन केलं. (Latest Marathi News)
आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विद्यार्थी सेनेचा वर्धापन दिन आणि आजच्या दिवसाच्या निमित्ताने 'रील्स बाज'(Reel Baaz) पुरस्कार या विशेष सोहळ्याचं आयोजन मुंबईचा रविंद्र नाट्य मंदिरात करण्यात आलं. मराठी कन्टंट क्रिएटर्ससाठी हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला. या सोहळ्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हजेरी लावली.
या सोहळ्यात राज ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रात ज्या दिवशी डान्सबार बंद झाले, त्यावेळी लागलेली सवय रील्समुळे पूर्ण झाली. लोक आता एक एकटे बसलेले असतात. तुमच्या हातात विलक्षण हत्यार आलेले आहे. मी महाराष्ट्र कसा बघतो, या दृष्टीकोनातून मी एक व्हिडिओ तयार केला आहे, तो दाखवा. तुमच्या या हत्यारामधून महाराष्ट्राचे प्रबोधन देखील झाले पाहिजे.
'मी फार बोलणार नाही. अमितने मला सांगितलं की तू दोन मिनिटे बोल आणि निघ. मी घरच्यांच्या फार विरोधात जात नाही. तुम्ही जे करत आहात, ती फार महत्वाची आणि जबाबदारीची गोष्ट आहे, असे राज ठाकरे पुढे म्हणाले.
'आपल्या देशात जे लेखक कलाकार किंवा नाटककारांमध्ये तुम्ही देखील येता. जो समाज तुमच्यामध्ये रममाण होतो.या देशावर तुमचे मोठे ऋण आहेत. तुम्ही नसता तर या देशात कधीच अराजक आले असते, असे ठाकरे म्हणाले.
'आज महाराष्ट्राची परिस्थिती पाहिली ,तर कोण कुठं काही कळत नाहीये. या सगळ्याकडे तुमच्यामुळे दुर्लक्ष आहे, हा समाज तुमच्यात रमला आहे, असेही राज ठाकरे पुढे म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.