Atul Bhatkhalkar: वर्षा गायकवाड यांचे आरोप खोडसाळ स्वरूपाचे; आमदार अतुल भातखळकरांची टीका

MLA Atul Bhatkhalkar : कांदिवलीच्या लोखंडवाला परिसरात छटपूजा करण्यास परवानगी काँग्रेस पक्षाच्या माजी नगरसेवकांना परवानगी नाकारण्यात आलीय.
MLA Atul Bhatkhalkar
MLA Atul BhatkhalkarSaam tv
Published On

MLA Atul Bhatkhalkar Replied To Varsha Gaikwad:

छटपुजेवरून भाजप आणि काँग्रेस नेत्यामध्ये वाद पेटलाय. छटपुजेवर वर्षा गायकवाड यांनी भाजपवर टीका केल्यानंर भाजपकडून उत्तर देण्यात आलंय. कांदिवलीमधील भारतीय जनता पार्टी आणि मी स्वतः छटपुजेला विरोध करतोय, हा वर्षा गायकवाड यांचा आरोप अत्यंत खोडसाळ स्वरूपाचा असल्याची टीका भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी केलीय.(Latest News)

गेल्या अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टी आणि आपण स्वतः कांदिवली पूर्व विधानसभेत छटपूजा अत्यंत उत्साहात साजरी करतो. येथे काँग्रेसच्या माजी नगरसेविका छटपूजा करत होत्या. मात्र लोकांनी त्यातील आर्थिक गफलतीविषयी तक्रारी केल्या, म्हणून मुंबई महापालिकेने त्यांना परवानगी नाकारली ही वस्तुस्थिती आहे. माझ्या कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघात वर्षानुवर्षे हनुमान नगरमध्ये दोन ठिकाणी आणि पोयसरमध्ये तीन ठिकाणी भारतीय जनता पार्टी छटपूजा साजरी करत असते. त्याला उत्तम प्रतिसाद मिळत असतो.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरवर्षीप्रमाणे यंदाही त्याच उत्साहात आणि जोशात लोखंडवाला येथील महाराणाप्रताप उद्यान येथे भाजपच्या वतीने जोरदार छटपूजा साजरी करण्यात येणार आहे. लोकांची दिशाभूल करण्यासाठी काँग्रेसवाल्यांनी अशा स्वरुपाचे खोडसाळ आरोप करू नयेत, असेही आमदार भातखळकर म्हणाले.

काय म्हणाल्या वर्षा गायकवाड

काँग्रेसच्या माजी नगरसेविका अजिंठा यादव यांना कांदिवलीच्या लोखंडवाला परिसरात छटपूजा करण्यास परवानगी कारण्यात आलीय. गेली अनेक वर्ष राजपत सेवा मंडळातर्पे आयोजित होणाऱ्या छटपुजेला महापालिकेने आधी परवानगी दिली, नंतर नाकारली. हे भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांच्या सांगण्यावरून पालिकेने, हा घुमजाव केल्याची टीका मुंबई प्रदेश काँग्रेस अध्यक्षा प्रा. वर्षा गायकवाड यांनी केली.

भाजप आणि शिंदे सरकार धर्माच्या नावावर लोकांमध्ये भांडण लावते. लोकांच्या आस्थेवर राजकारण करत त्यांच्यात भांडण लावण्याचं काम करते.नवरात्री आणि दसऱ्याच्या वेळी आझाद मैदानातील रामलीलेत विघ्न आणणाऱ्या शिंदे-भाजप सरकारने आता छट पुजेलाही विरोध केल्याचा आरोप वर्षा गायकवाड यांनी केला. काँग्रेसच्या माजी नगरसेविका अजंता आणि त्यांचे पती राजपत यादव हे जवळपास १२ वर्षापासून तेथे छटपूजा साजरी करत असतात. कांदिवलीच्या लोखंडवाला परिसरातील महाराणा प्रताप उद्यानात छटपूजा साजरी केली जात होती.

महिला भाविकांना दूर समुद्रकिनार जाऊन पूजा करावी, लागू नये. यासाठी उद्यानात सात छट कुंड उभारली होती. यावेळीही छट पुजेच्या आयोजनासाठी त्यांनी पालिकेकडे परवानगी मागितली. ६ नोव्हेंबर रोजी पालिकेने त्यांना परवानगी दिल्यावर त्यांनी अनामत रक्कम म्हणून १ लाख रुपयेही पालिकेत भरले. त्यानंतर अचानक पालिकेने राजपत सेवा मंडळाला परवानगी नाकारण्यात आली. भाजपचे स्थानिक आमदार अतुल भातखळकर यांच्या सांगण्यावरून ही परवानगी नाकारण्यात आल्याचंही पालिकेने स्पष्ट केल्याचं वर्षा गायकवाड म्हणाल्या.

MLA Atul Bhatkhalkar
Maharashtra Politics: 'कॉंग्रेसप्रमाणे उद्धव ठाकरेंनाही 'रामनामाची' ऍलर्जी...' चंद्रशेखर बावनकुळेंचा घणाघात

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com