Nagpur Crime : १२ हजार रुपयांसाठी भाजप पदाधिकाऱ्याची हत्या, मध्यप्रदेशात मारेकऱ्यांना अटक

Nagpur Crime : मजुरीचे पैसे न दिल्याच्या रागातून भाजप पदाधिकाऱ्याची हत्या करण्यात आल्याची घटना नागपूरमध्ये घडली होती.
Nagpur Crime
Nagpur Crime Saam Tv
Published On

Nagpur Crime :

मजुरीचे १२ हजार रुपये न दिल्यामुळे भाजपचे नागपूर जिल्हा पदाधिकारी, माजी सरपंच तथा ग्रामपंचायत सदस्याची हत्या झाल्याची घटना रविवारी घडली. याप्रकरणी नागपूर ग्रामीण पोलिसांनी मध्य प्रदेशातून दोन जणांना अटक केलीय. विशेषकुमार रामदास रघुवंशी (वय ३३, रा. मंडला) आणि आदी चंद्रामणी नायक (वय ३०, रा. ओदिशा) अशी अटक करण्यात आलेल्या मारेकरीची नावे आहेत. हत्या झालेल्या भाजप जिल्हा पदाधिकारीचे नाव राजू डेंगरे आहे. (Latest News)

अटक करण्यात आलेल्या मारेकरींनी आपला गुन्हा कबूल केलाय. आपल्या मजुरीचे पैसे न मिळाल्यानं आपणच राजू यांची हत्या केल्याची कबुली त्यांनी पोलिसांसमोर दिलीय. घटनेप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशेषकुमार आणि आदी हे राजू डेंगरे यांच्या ढाब्यावर काम करत होते. दिवाळीनिमित्त त्यांना गावाला जायचं होतं. त्यासाठी त्यांनी राजू डेंगरे यांच्याशी पैशांची मागणी केली.

गावाला जाण्यापूर्वी विशेषकुमार आणि आदी यांनी राजू यांच्याकडे पैशांची मागणी केली होती. त्यांना राजू यांच्याकडून प्रत्येकी ६ हजार रुपये असे एकूण १२ हजार रुपये घ्यायचे होते. मात्र राजू ही रक्कम देण्यासाठी टाळाटाळ करीत होते. यावरून त्यांच्यात वादही झाला होता. राजू डेंगरे पैसे देत नसल्यानं दोघेही चिडले होते. पैसे देत नसल्याच्या रागात त्यांनी डेंगरे यांच्या हत्येचा कट रचला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

रविवारी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास विशेषकुमारनं आदीच्या मदतीने राजू यांचा कपड्यानं गळा आवळला. त्यानंतर चाकूने वार करत राजू यांची हत्या केली. राजू यांच्या अंगावर ब्लँकेट टाकत दोघेही कार घेऊन फरार झाले. होते. दुसऱ्या दिवशी ही घटना उघडकीस आल्यानंतर भाजपच्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली. पोलिसांनी याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला.

नागपूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी तपास स्वत:च्या हाती घेत पथकांना कामाला लावले. पोलिसांनी खबऱ्यांनाही कामाला लावलं. एका खबऱ्यानं नियमितपणे ढाब्यावर जेवायला येणाऱ्या विशेषकुमारच्या मित्राबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी त्याची चौकशी केली. पोलिसांना विशेषकुमारचा मोबाइल क्रमांक मिळाला, त्याआधारे पोलिस मंडला येथे पोहोचले. त्यानंतर त्यांना अटक केली.

Nagpur Crime
Ganesh Wagh Bribe Case: लाचखोर वाघ अखेर पोलिसांच्या पिंजऱ्यात अडकला; १२ दिवसांपासून होता फरार

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com