gondia police arrests three youth
gondia police arrests three youthsaam tv

Gondia Crime News : युवकाच्या हत्येप्रकरणी गाेंदियातील तिघांना अटक, रामनगर पाेलीसांची कारवाई

संशयितांनी घटनास्थळावरुन पळ काढला हाेता.
Published on

- शुभम देशमुख

Gondia Crime News:

दुचाकीला कट मारल्याच्या कारणावरून झालेल्या वादात तिघांनी अर्पित ऊर्फ बाबू ओमप्रकाश उके (२३) रा. आंबाटोली या तरुणाला धारदार शस्त्राने भोसकून ठार केल्याची घटना दिवाळीच्या पहिल्या दिवशी घडली हाेती. या प्रकरणाताल तीन संशयितांना पाेलीसांनी अटक केली आहे. (Maharashtra News)

gondia police arrests three youth
Nandurbar Crime News : लक्ष्मीपूजनाच्या रात्री युवकाचा खून, नंदुरबारच्या अमृत चौकात पाेलीसांचा माेठा बंदाेबस्त

पाेलीसांकडून मिळालेल्या माहितीनूसार अर्पित ऊर्फ बाबु ओमप्रकाश उके हा पाल चौक गुरुद्वारा रस्त्याने जात असताना चायशाय बार समोर मोटारसायकलने कट मारल्याच्या कारणावरून त्याचा संशयितांसमवेत वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की यामध्ये चाकूने सपासप वार करून अर्पित ऊके याची हत्या करण्यात आली.

त्यानंतर संशयितांनी घटनास्थळावरुन पळ काढला. रामनगर पोलिसांनी त्यांच्या शोधात पथके रवाना केली होती. रामनगरच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने तिघांना अटक केली आहे. पाेलीसांकडून मिळालेल्या माहितीनूसार हर्ष वाघमारे, अंकज राणे, प्रवीण मुटकुरे असे अटकेतील संशयितांची नावे आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

gondia police arrests three youth
Sambhajiraje Chhatrapati Viral Video : चर्चा तर हाेणारच! संभाजीराजेंना लागले मुख्यमंत्री हाेण्याचे वेध (पाहा व्हिडिओ)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com