पंढरपूर : राष्ट्रवादीमध्ये फूट पाडल्यानंतर अजित पवार यांच्यासोबत काही आमदार गेले आहेत. यात समावेश असलेले मंत्री अनिल पाटील यांच्याबाबत शरद पवार (Sharad Pawar) यांनी मोठा दावा केला आहे. पवारांच्या या दाव्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. अजित पवार (Ajit Pawar) गटाचे मंत्री अनिल पाटील हे पुन्हा विधानसभेवर निवडून आलेले दिसणार नाहीत; असा खळबळजनक दावा राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी केला आहे. (Breaking Marathi News)
हिवाळी अधिवेशनानंतर अजित पवार आणि शरद पवार हे दोन्ही राष्ट्रवादीचे (NCP) नेते एकत्र आलेले दिसतील असे विधान मंत्री अनिल पाटील यांनी केले होते. त्यावर आज शरद पवार यांना विचारले असता त्यांनी अनिल पाटील यांच्यावर निशाना साधत ते पुन्हा विधानसभेवर निवडून आलेले दिसणार नाहीत; असा दावा केला.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
नुकताच अमळनेर विधानसभा मतदार संघाचा दौरा केला आहे. मतदार संघातील लोकांशी मी बोललो तेव्हा तेथील लोकांमध्ये मंत्री अनिल पाटील पाटील यांच्याबाबत नाराजीचा सूर आहे. यामुळे त्यांनी सांगितले की अनिल पाटील हे पुन्हा निवडून येणार नाहीत. शरद पवारांच्या या दाव्यामुळे अजित पवार गटात मोठी खळबळ उडाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.