Sharad Pawar News: मी माझ्या काळात अनेक प्रधानमंत्री पाहिले, पण...'; शरद पवारांची नाव न घेता PM नरेंद्र मोदींवर टीका

Sharad Pawar News: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर नाव न घेता टीका केली.
Sharad Pawar News
Sharad Pawar News SAAM TV
Published On

Sharad Pawar News:

'मी माझ्या काळात अनेक प्रधानमंत्री पाहिले. मात्र, ते कोणत्याही राज्यात गेल्यानंतर त्या राज्यातील मुख्यमंत्र्यांबद्दल व्यक्तिगत उद्गार आजवरच्या यापूर्वी झालेल्या कोणत्याही प्रधानमंत्र्यांनी काढलेले मी ऐकले नाही, अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर नाव न घेता टीका केली. (Latest Marathi News)

दिवाळी पाडव्याच्या निमित्त व्यापारी मर्चंट असोसिएशनच्या वतीने एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला शरद पवार यांनी व्यापाऱ्यांना मार्गदर्शन केले.

या बैठकीत उपस्थितांशी संवाद साधताना शरद पवार म्हणाले, 'व्यापारी व सहकार क्षेत्रात अनेक लोकहिताचे कायदे केले. शेतकरी आणि व्यापारी यांच्या विचाराचे सूत्र घेऊन काम केल्यास बाजारपेठेला वेगळे स्थान निर्माण होईल. व्यापार सुलभ पद्धतीने झाला पाहिजे आणि चार पैसे शेतकरी-व्यापारी यांच्या पदरात पडले पाहिजे. केंद्र सरकारचा या घटकाकडे बघण्याचा दृष्टीकोण सांमज्यस पणाचा असल्याचे मला दिसत नाही'.

Sharad Pawar News
Subrata Roy Passed Away: सहारा इंडियाचे प्रमुख सुब्रत रॉय यांचे निधन

'देशातील व्यापारी धोरणे ठरविण्याचा अधिकार केंद्र सरकारला असतो. मात्र निर्णय घेताना उत्पादक आणि व्यापार यांचा समन्वय महत्वाचा आहे. केंद्र सरकारची अनेक धोरणे लोकांना कळत नाहीत, याच कारण सुसवांद नाही. आजचे अर्थमंत्री आणि व्यावसायिक घटक यांच्यात कोणतीही चर्चा होताना दिसत नाही. हल्लीच्या केंद्रीय अर्थमंत्री कधी भेटल्या नाहीत, कधी त्यांच्याशी चर्चा होत नाही, त्यांचा सुसवांद नाही. व्यापार आणि त्यांचे इतर घटक यांना विचारात घेतले जात नाही, असं म्हणत शरद पवारांनी सरकारवर टीका केली.

'पंतप्रधानांनी लक्ष न दिल्याने अनेक समस्या उभ्या राहतात. संसदेच्या सभागृहात एक तास देखील पंतप्रधान आले नाहीत, याचा परिणाम अनेक प्रश्नांची सोडवणूक करण्यावर होतो. सध्या पाच राज्यात निवडणुका चालू आहेत, त्या ठिकाणी जाऊन प्रधानमंत्री काय बोलतात हे आपण पाहिले, असा टोला शरद पवारांनी पंतप्रधान मोदींना लगावला.

'देशाचे मूलभूत प्रश्न सुटू शकत नाहीत, याचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर झाला, तर त्याची किंमत उत्पादक-व्यापारी प्रत्येकाला द्यावी लागेल. त्या प्रकारची स्थिती निर्माण होत आहे. कारखानदारी कशी वाढेल? तयार झालेला माल देशाच्या बाहेर कसा जाईल? आपल्या देशाची आर्थिक स्थिती मजबूत कशी होईल? याच्यावर विचार करण्याची आवश्यकता आहे, असे पवारांनी सूचित केले.

Sharad Pawar News
Maharashtra Government Holiday : २०२४ मध्ये किती सुट्ट्या मिळणार? राज्य सरकारने जाहीर केली सार्वजनिक सुट्ट्यांची यादी

'अधिकच्या हातांना काम देणे आणि बाजारपेठ बलवान करणे हे काम सरकारचे असते. व्यापारी आणि उत्पादकांच्या प्रश्नावर जागृत राहून योग्य प्रकारची आग्रही भूमिका घेतली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com