Mumbai Political News : ७ वेळा नगरसेविका, माजी सभागृह नेत्या; तृष्णा विश्वासराव यांचा ठाकरे गटातून शिवसेनेते प्रवेश, कारण...

Shivsena News : तृष्णा विश्वासराव यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार सदा सरवणकर आणि आमदार मनीषा कायंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे.
trushna vishwasrao join Shivsena Shinde Group
trushna vishwasrao join Shivsena Shinde Group Saam TV
Published On

भूषण शिंदे

Mumbai News : उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका तृष्णा विश्वासराव यांनी शिवसेना शिंदे गटात आज प्रवेश केला आहे. तृष्णा विश्वासराव या माजी सभागृह नेत्या आणि ७ वेळा नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. तृष्णा विश्वासराव यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार सदा सरवणकर आणि आमदार मनीषा कायंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे.

तृष्णा यांची उपनेते पदी वर्णी करत असल्याची घोषणाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कार्यपद्धती आणि कष्ट करून काम करण्याची पद्धत आवडल्याने आपण शिवसेनेमध्ये प्रवेश केला असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. यापुढे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी एकनिष्ठ राहून पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितलं. (Latest Marathi News)

trushna vishwasrao join Shivsena Shinde Group
Monsoon season 2023: ‘मी सावत्र भावाच्या दृष्टीने नाही तर...’; निधीवाटपावरून अजित पवारांचा यशोमती ठाकूरांना टोला

मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे काम पहिले आहे. इर्शाळवाडीमध्ये पहाटे पोहचून ५ तास डोंगर चढून गेले. तेथील अनाथ मुलांना त्यांनी दत्तक घेतले. म्हणून प्रभावित होऊन मी पक्षप्रवेश करत आहे, असं तृष्णा विश्वासराव यांनी सांगितलं. (Political News)

trushna vishwasrao join Shivsena Shinde Group
Maharashtra Politics: बारामतीत महायुतीचा उमेदवार जिंकणार; भाजपच्या बड्या नेत्याच्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

मुख्यमंत्री काय म्हणाले?

तृष्णा ताई या तब्बल सात वेळा निवडून आल्या आहेत आणि आज शिवसेनेत पक्ष प्रवेश करत आहेत. तृष्णा ताईंचे नाव अभिमानाने घेतले जाते, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.

आपण मुंबईमध्ये काम केले आहे. मुंबईमध्ये कोणाला किती अधिकार होते हे आपल्याला माहित आहे. जेव्हा अधिकार मिळाले तेव्हा आम्ही रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी निर्णय घेतला. लोक जो विश्वास दाखवत आहेत त्यासाठी लोकांचे आभार, असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com