Monsoon season 2023: ‘मी सावत्र भावाच्या दृष्टीने नाही तर...’; निधीवाटपावरून अजित पवारांचा यशोमती ठाकूरांना टोला

ajit pawar News: यशोमती ठाकूर यांच्या टीकेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं.
Monsoon season 2023
Monsoon season 2023Saam tv
Published On

Ajit Pawar News: आज विधानसभेच्या सभागृहात निधीवाटपावरून आणि पुरवणी मागण्यांवरून एकच गोंधळ पाहायला मिळाला. यादरम्यान, काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांनीही निधीवाटपावरून ‘आमच्याकडे सावत्र भावाच्या दृष्टीने बघू नका, असा टोला राज्य सरकारला लगावला. यशोमती ठाकूर यांच्या टीकेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. (Latest Marathi News)

राज्य सरकारने मांडलेल्या पुरवणी मागण्यावरील चर्चेला उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी उत्तर दिलं. यावेळी काँग्रेस व इतर नेत्यांनी उपस्थिती प्रश्नांनाही उत्तर दिलं. तसेच आमदार यशोमती ठाकूर यांच्या टीकेलाही प्रत्युत्तर दिलं.

Monsoon season 2023
Maharashtra Politics: बारामतीत महायुतीचा उमेदवार जिंकणार; भाजपच्या बड्या नेत्याच्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

अजित पवार सभागृहात उत्तर देताना म्हणाले, ‘बाळासाहेब थोरातांनी आरोप केला की, सत्ताधारी पक्षाला निधी दिला जातो. तर विरोधी पक्षाला निधी दिला जात नाही. पण २०१९, २०२०, २०२१ या वर्षात जे सूत्र आहे, तेच पुढे चालू आहे. त्यात कोणताही बदल केला नाही’.

‘यशोमतीताई आणि वर्षाताई माझ्या बहिणीसारख्या असून तुम्ही माझं ऐकून घ्या. त्यांना प्रश्न विचारायचा अधिकार आहे. महाविद्यालय देताना आम्ही बाळासाहेब थोरात यांनाही दिले आहे. थोरात यांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची परवानगी घेऊनच थोरात यांना महाविद्यालय देण्यात आले आहे, असे अजित पवार म्हणाले.

दरम्यान, राज्यातील साखर कारखान्यावरही अजित पवारांनी भाष्य केलं. ‘सहकारी साखर कारखान्यासाठी मार्जिन मनी लोनसाठी ५४९ कोटी रुपये दाखविण्यात आले आहेत. काही जणांचे कारखाने असून त्यांच्यासाठी तरतूद करण्यात केलेली आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच बिनव्याजी कर्जासाठी ७९८ कोटींची तरतूद केली, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.

Monsoon season 2023
Mumbai Police Force recruitment: मुंबई पोलीस दलात कोणतीही कंत्राटी भरती होणार नाही; गृहविभागातील सूत्रांची माहिती

यशोमती ठाकूर यांना दिले प्रत्युत्तर

काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांच्या वक्तव्याला उत्तर देताना अजित पवार म्हणाले, ‘मी सावत्र भावाच्या दृष्टीने नाही तर सख्ख्या भावाच्या नात्याने ओवाळणी देतो. आम्ही कोणताही दुजाभाव करत नाही, असंही अजित पवार सभागृहात म्हणाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com