Maharashtra Politics: 'कॉंग्रेसप्रमाणे उद्धव ठाकरेंनाही 'रामनामाची' ऍलर्जी...' चंद्रशेखर बावनकुळेंचा घणाघात

Chandrashekhar Bawankule On Uddhav Thackeray: मोदी आणि अमित शहांसाठी आचारसंहितेत बदल केला का? असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला आहे.
Chandrashekhar Bawankule, Uddhav Thackeray,
Chandrashekhar Bawankule, Uddhav Thackeray, saam tv

Chandrashekhar Bawankule News:

भाजपकडून हिंदुत्व आणि राममंदिराच्या मुद्द्यांवर सुरू असलेल्या निवडणुक प्रचारावर ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरेंनी प्रश्न उपस्थित केले. मोदी आणि अमित शहांसाठी आचारसंहितेत बदल केला का? असा सवाल उपस्थित करत ठाकरे गटाने निवडणुक आयोगाला पत्रही पाठवण्यात आल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. ठाकरेंच्या या टीकेला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी प्रत्यूत्तर दिले असून कॉंग्रेसप्रमाणे ठाकरेंनाही रामनामाची ऍलर्जी झाल्याची टीका त्यांनी केली.

काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे?

"काँग्रेसप्रमाणे आता उद्धव ठाकरेंनाही (Uddhav Thackeray) रामनामाची ॲलर्जी झाली आहे. रामनामाचा आणि रामभक्तांचा भाजपला अभिमान आहे. तुम्हाला मात्र आता रामनामाचा गजर केला की त्रास होतोय..." असा टोला चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी लगावला आहे.

तसेच काँग्रेसनं (Congress) प्रभू रामचंद्रांच्या अस्तित्वाचे पुरावे मागितले होते. आता तुम्ही रामनाम आणि रामभक्तांचा तिरस्कार करत आहात. तुम्ही कितीही विरोध केला तरी करोडो रामभक्त आयोध्येत (Ram Mandir Ayodhya) जाऊन रामलल्लांचं दर्शन घेतील...असेही चंद्रशेखर बावनकुळे यावेळी म्हणाले.

Chandrashekhar Bawankule, Uddhav Thackeray,
Raghunathdada Patil News : कायदा नव्हे केवळ बियाणे कंपन्याकडून पैसे उकळण्याचा सरकारचा उद्देश : रघुनाथदादा पाटील

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?

१९९५ साली साली आमचे 5 ते सहा आमदार हे बाद ठरवले गेले. या आमदारांसोबत बाळासाहेबांचा मतदानाचा अधिकार काढण्यात आला होता. हिंदुत्वाचा प्रचार केला म्हणून ही कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे आता निवडणूक आयोगाने आचार संहितेमध्ये बदल केलेत का?" असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला. तसेच बदल करण्यात आला असेल तर आयोगाने आम्हाला पण सांगावं असेही ते म्हणाले. (Latest Marathi News)

Chandrashekhar Bawankule, Uddhav Thackeray,
Raj Thackeray News: 'मनोज जरांगेंच्या पाठीशी कोण? कालांतराने समोर येईलच...' मराठा आरक्षणावरुन राज ठाकरेंचे मोठे विधान

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com