Vasai Virar Metro: आता वसई-विरारपर्यंत मेट्रो धावणार; नवीन मार्ग प्रस्तावित; १७ स्थानके असणार; मार्ग कसा असणार?

Mira Bhayandar to Virar Vasai Metro: विरारकरांसाठी आनंदाची बातमी आहे. आता मीरा भाईंदर ते विरारपर्यंत मेट्रो धावणार आहे. यासाठी नवीन मार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे.
Vasai Virar Metro
Vasai Virar MetroSaam Tv
Published On
Summary

मुंबईत मेट्रोचा विस्तार होणार

मीरा भाईंदर ते विरारपर्यंत मेट्रो धावणार

नवीन मार्ग प्रस्तावित

मुंबईसह उपनगरात मेट्रोचे जाळे पसरत आहे. मेट्रोचा विस्तार झपाट्याने होत आहे. दरम्यान, आता मेट्रोचा विस्तार विरार-वसईपर्यंत होणार आहे. दरम्यान, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मिरा-भाईंदर ते विरार मेट्रो कॉरिडोरचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवला आहे. या प्रकल्पास मंजुरी मिळाल्यानंतर विरारपर्यंत मेट्रोचे जाळे पसरणार आहे. दरम्यान, याआधीच्या प्रस्तावित मार्गाचे संरेखन बदलल्याने प्रकल्पाचा खर्च वाढला आहे. हा खर्च ६९०० रुपयांवरुन ७२४ कोटी रुपये झाला आहे.

Vasai Virar Metro
Mumbai Metro 9: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् एकनाथ शिंदेंचा नवीन मेट्रोतून प्रवास| VIDEO

मिरा भाईंदर ते वसई-विरार कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी एमएमआरडीएच्या आधीच्या योजनेनुसार मेट्रो १३चा मार्ग शिवाजी चौक ते विरार असा होता. आता हा मार्ग भाईंदर ते विरार उत्तरेकडील डोंगरपाडा असणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. नवीन मार्गातील सुरुवातीचे आणि शेवटचे स्थानक बदलण्यात आले आहे. भाईंदर येथे सुभाषचंद्र बोस मैदान हे स्थानक असेल.

सध्या सुरु असलेल्या मेट्रो ९ दहिसर पूर्व ते मिरा भाईंदरसोबत इंटरचेंज मिळणार आहे. तर विरार बाजूला ही मार्गिका डोंगरपाडापर्यंत असणार आहे.विरारमधील नारिंगी क्रिकेट ग्राउंडजवळ कार डेपो प्रस्तावित आहे. दरम्यान, जुन्या मार्गाचे काम २०२६ च्या शेवटपर्यंत होणे अपेक्षित होते. परंतु आता प्रकल्पात बदल झाल्याने खर्चात वाढ झाली आहे, असं एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Vasai Virar Metro
Mumbai Metro: मुंबई मेट्रोचा 337 किमीपर्यंत विस्तार होणार; उपमुख्यमंत्र्यांनी सांगितला भविष्यातील मास्टर प्लॅन

स्थानके कोणती असणार? (Virar Metro Stations List)

हा नवीन मेट्रो मार्ग २४.९ किमी लांब असणार आहे. यामध्ये १७ स्थानके असणार आहे. यामध्ये ३ स्थानके भुयारी आणि १४ उन्नत करण्याचे नियोजन आहे. वसई ते नालासोपारा ३.२५ किमीचा भुयारी मार्ग असणार आहे. यामध्ये सुभाषचंद्र मैदान, नायगाव, छत्रपती शिवाजी महाराज चौक, जुचंद्र, राजवली, गोलाणी नाका, वसई, वसई-विरार महापालिका अग्निशमन केंद्र, आचोळे गाव, नालासोपारा पूर्व, नालासोपारा पश्चिम, मोरया नगर, यशवंत नगर, विरार, विवा कॉलेज, याझू पार्क आणि डोंगरपाड ही स्थानके असणार आहेत.

Vasai Virar Metro
Pune Metro: पुणेकरांच्या कामाची बातमी! हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो या दिवशी सुरु होणार, तारीख आली समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com