Dhanshri Shintre
महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यात नायगाव हे एक महत्त्वाचे ठिकाण असून ते विविध सामाजिक आणि सांस्कृतिक वैशिष्ट्यांसाठी ओळखले जाते.
वर्सोवा आणि घोडबंदर पुलाद्वारे नायगाव नवघरशी जोडले असून, त्याच्या पूर्व भागाला राष्ट्रीय महामार्गाने सहज प्रवेश मिळतो.
नायगाव रेल्वे स्थानक पश्चिम रेल्वेवरील एक महत्त्वाचे स्थानक असून, ते स्थानिक प्रवाशांसाठी सेवा प्रदान करते.
जेव्हा मुंबई शहराच्या नजीक शहराची वस्ती वाढत होती तेव्हा नवीन एक गाव तयार करण्यात आलं.
ज्याचं नाव होतं नया गाव किंवा नवा गाव.
हे नाव ‘न्याय-ग्राम’ या शब्दावरून आलेले आहे.
पूर्वी हे एक खेड होतं. या ठिकाणी राजा भीमदेवाचे न्यायालय आणि राजवाडा होता.
न्याय मिळण्याचे ठिकाण, न्याय आणि ग्रामचा अपभ्रंश होऊन नायगाव हे नाव तयार झालं.
परंतू आता तिथे एवढे डेव्हलपमेंट झालेली आहे की आता तुम्हाला बिल्डिंगी बिल्डिंगी दिसतील.