राज्यातील 'या' महापालिकेत मांसाहारबंदी; 6 महासभेच्या मेन्यूत बदल

Mira-Bhayandar Non-Veg Ban Sparks Row: मिरा-भाईंदरमध्ये पुन्हा एकदा अजब फतवा काढण्यात आलाय. मात्र, आता कुठल्या शाळेनं नव्हे तर चक्क महापालिकेतच हा फतवा काढलाय. चक्क नगरसेवकांच्याच पसंतीच्या खाण्यापिण्यावर बंदी घालण्यात आलीय. काय आहे हा फतवा? भाजपच्या पालिकेत शिंदेसेनेनंही का घेतलाय आक्रमक पवित्रा? पाहूयात हा रिपोर्ट........
MIRA BHAYANDAR MUNICIPAL CORPORATION
MIRA BHAYANDAR MUNICIPAL CORPORATIONsaam tv
Published On: 

मिरा- भाईंदरमधील व्हेज-ऩॉनव्हेजचा वाद काही थांबायचं नाव घेत नाही...आधी विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डब्यावरून सुरू झालेले हे फतवे आता थेट मिरा-भाईंदर महापालिकेत पोचलेत. गेल्या 25 वर्षांपासून महापालिकेच्या महासभेत नॉनव्हेज मेन्यू होता तो आता अचानक काढून टाकण्यात आलाय. आता नगरसेवकांनाच मासांहार बंदी करण्यात आल्यानं विरोधक आक्रमक झालेत. शहरातील शाकाहारी वर्गाच्या एकगठ्ठा मतांसाठीच हा निर्णय घेतल्याचा आरोपच काँग्रेसने केलाय..तर दुसरीकडे, सत्ताधारी भाजपनं मात्र विरोधकांचे आरोप फेटाळलेत...

या निर्णयामुळे मिरा-भाईंदरमधील राजकारण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हं आहेत. महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या शिंदसेनेच्या मंत्र्यांनी या निर्णयाला विरोधक करत उघड टीका केलीय.

गेल्या 6 महिन्यांपासून महासभेदरम्यान केवळ व्हेज जेवण दिलं जात असल्यानं आगरी-कोळी समाजातील नगरसेवकांमधून नाराजी व्यक्त केली जातेय. खरंतर, मिरा-भाईंदरमधील हा वाद काही नवा नाहीये. याआधी मराठी आणि जैन यांच्यात वाद निर्माण होतील असे अनेक प्रकार समोर आलेत. शहरातील एका समूहाकरिता इतरांच्या खाद्यसंस्कृतीवर घाला घालण्याचा अधिकार महापालिकेला कुणी दिला?... उगाचंच असे फतवे काढून समाजात दुफळी माजवण्याची गरजच काय? मीरा-भाईंदर महापालिकेत सुरू असलेल्या या दडपशाहीची भाजपचे वरिष्ठ नेते दखल घेतील का असा सवाल विचारला जातोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.